अहमदनगर

दुचाकीवरून जाणार्‍या दोन मित्रांना आडविले आणि हत्याराने…

दुचाकीवरून जाणार्‍या दोन मित्रांना आडवून हत्याराने मारहाण करण्यात आली. राजचेंबर, कोठला येथे ही घटना घडली. आकाश ऊर्फ अक्षय जिजाराम साबळे (वय 26), सागर शंकर धोत्रे (रा. रामवाडी, अहमदनगर) हे दोघे मारहाणीत जखमी झाले आहेत.

जखमी आकाश ऊर्फ अक्षय जिजाराम साबळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रितेश (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही), सिध्दार्थनगर येथील घोडेवालेचे दोन जुळे मुले (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आकाश व त्याचा मित्र सागर हे दोघे दुचाकीवरून राजचेंबर कोठल्याकडे जात असताना अचानक रितेश व घोडेवालेचे दोन जुळे मुले यांनी त्यांना शिवीगाळ करून, काही तरी हत्याराने मारहाण केली. परत दिसले तर मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार एस. बी. आंधळे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button