अहमदनगर

दोन मालट्रकची समोरासमोर धडक; एक ठार, एक जखमी

अहमदनगर-दौंड रस्त्यावर खंडाळा (ता. नगर) गावच्या शिवारात दोन मालट्रकची समोरासमोर धडक होऊन एका मालट्रक चालकाचा मृत्यू झाला. तर दुसरा जखमी झाला.

रोहन गावडे (रा. मोहोळ जि. सोलापूर) असे मयत चालकाचे नाव आहे. ज्योतिराम दळवी हा चालक जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की दोन्ही मालट्रकच्या केबीनचा चक्काचूर झाला.

अहमदनगरकडून दौंडच्या दिशेने जाणार्‍या मालट्रकला दौंडकडून येणार्‍या भरधाव मालट्रकने खंडाळा गावच्या शिवारात धडक दिली. या धडकेत मालट्रक चालक गावडे यांचा मृत्यू झाला तर दुसरे मालट्रक चालक दळवी जखमी झाले आहेत. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button