Two Keys With Car : नवीन कार, बाईक आणि स्कूटरसोबत 2 चाव्या का येतात? जाणून घ्या मोठे कारण…
नवीन वाहन खरेदी कारण्यावेळी तुम्हाला दोन चाव्या दिल्या जातात. यामागे एक महत्वाचे कारण आहे, तुम्ही जाणून घ्या.

Two Keys With Car : तुम्ही अनेकवेळा पाहिले असेल की दुचाकी किंवा चारचाकी असणाऱ्या कंपन्या नवीन कार खरेदी करताना ग्राहकांना कारसोबत दोन चाव्या देत असतात. यामागे नेमके काय कारण असेल हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
आज आम्ही तुम्हाला याचे महत्वाचे कारण सांगणार आहे. याचे सर्वात मोठे कारण चावी हरवण्याशी संबंधित आहे आणि त्यानंतर दुसरे कारण देखील त्याच्याशी संबंधित आहे. या दोन्ही चाव्या तुमच्यासाठी खूप महत्वाच्या असतात, जर तुमच्यकडून चावी हरवली तर तुम्हाला अनेक अडचणी येत असतात.
दुसरा मार्ग म्हणून काम करते
कार, बाईक आणि स्कूटर इत्यादींसोबत दोन चाव्या दिल्या जातात जेणेकरून एक चावी नेहमी तुमच्याकडे असते आणि दुसरी चावी तुम्ही तुमच्या घरी सुरक्षितपणे ठेवू शकता. कारण अनेक वेळा तुमच्यकडून चावी हरवली जाते, तेव्हा तुम्ही तुमची एक चावी गमावल्यास किंवा ती चोरीला गेल्यास, तुमच्याकडे तुमचे वाहन चालू करण्यासाठी दुसरा मार्ग म्हणजेच दुसरी चावी असेल.
आर्थिक फायदा
कंपन्यांनी दोन चाव्या देण्यामागे ग्राहकांना होणारा आर्थिक फायदा हे देखील एक कारण आहे. ग्राहकाची एक चावी हरवली तर दुसऱ्या चावीसाठी त्याला पैसे खर्च करावे लागतात, मात्र कंपन्यांनी दिलेल्या दुसऱ्या चावीमुळे ग्राहकांचा हा खर्च वाचतो. मात्र अनेकवेळा ग्राहक दोन्ही चाव्या हरवतात. ज्यामुळे दुसरी चावीही हरवली तर ग्राहकाला पैसे खर्च करावे लागतात.
याची काळजी घ्या!
तुमच्या वाहनाच्या चाव्या चोरीला गेल्यास त्या इंश्योरेंस क्लेममध्ये वापरल्या जातात. इंश्योरेंस क्लेममध्ये दोन्ही चाव्या विमा कंपनीला द्याव्या लागतात. जर तुमच्याकडे दोन्ही चाव्या नसतील तर अनेक वेळा कंपन्या हा दावा नाकारतात. जर तुमच्याकडे फक्त एकच चावी असेल तर कंपनी तुमचा इंश्योरेंस क्लेम नाकारेल अशी शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.