Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरअवैध वाळू वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडले, अहमदनगरमधील दोघे ठार

अवैध वाळू वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडले, अहमदनगरमधील दोघे ठार

Ahmednagar News : अवैध वाळू वाहतुकीने दोघांचे बळी घेतल्याची घटना समोर आली आहे. माजलगाव तालुक्यात वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने

राहाता तालुक्यातील रांजणखोल येथील दोन युवक जागीच ठार झाले. मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

या बाबात माहिती अशी की, रांजणखोल येथील विजय युवराज पगारे (३५) व अमोल रावसाहेब ढोकचौळे (३३), ३१ जानेवारी रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दुचाकी (क्र.१७ ही डब्लु ३२०९) वरून माजलगाव तालुक्यातील सादोळा येथे जात होते.

त्यावेळी सादोळा येथे वाळू घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दोघे जागीच ठार झाले. दरम्यान सादोळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत अपघातातील दोन्ही वाहने ताब्यात घेतली.

अपघाताची माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचा पंचनामा करत पोलिसांनी दोघांचे मृतदेह माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणले, अपघातानंतर पोलिसांनी ट्रॅक्टर व दुचाकी ताब्यात घेतली आहे.

 थोड्या अंतरावर ट्रॅक्टरही पलटी

अपघातानंतर पळून जात असलेले ट्रॅक्टरही काही अंतरावरच उलटले. त्यामुळे वाळू सांडली. पोलिसांनी ट्रॅक्टर आणि सांडलेली वाळू ताब्यात घेतली.

ट्रॅक्टरचालक पसार झाला आहे. अपघात झाल्यानंतर ट्रॅक्टरचालकावर माजलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर सादोळा येथील असल्याचे तपासात समोर आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments