Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरअहमदनगर जिल्ह्यात दोन ट्रकचा अपघात, एक ठार दोघे जखमी

अहमदनगर जिल्ह्यात दोन ट्रकचा अपघात, एक ठार दोघे जखमी

Ahmednagar News : शेवगाव – पैठण रस्त्यावरील घोटण गावाजवळ गुरुवारी रात्री एक ते दीडच्या दरम्यान दोन ट्रकमध्ये झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला.

तर दोघे जखमी झाले. जखमींवर अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शेवगाव-पैठण रोडवर जलजीवन योजनेंतर्गत काम सुरू आहे. या योजनेसाठी लोखंडी पाइपलाइन टाकण्यात येत आहे. या कामासाठी पाईप घेवून आलेला ट्रक (जेजे १२ बीडब्ल्यू ७८१२) हा शेवगाव- पैठण रस्त्यावरील घोटण गावाजवळ हॉटेल सागरसमोर पाईप उतरवण्यासाठी उभा होता.

तालुक्यात पावसामुळे पाईप उतरवण्यास अडचण आल्याने पाईपसह ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. दरम्यान, शेवगावहून पैठणकडे लोखंडी सळया भरलेला (एमएच ५० बीडब्ल्यू २९५९) क्रमांकाचा ट्रक दाट धुक्यामुळे आणि रस्ता न कळल्याने पाईपने भरलेल्या ट्रकला धडकला.

या अपघातात ट्रकचा चालक सिद्धलिंग अन्नपावा पुजारी, कुमशी, तहसील व जिल्हा कलबुर्गा (कर्नाटक) याचा जागीच मृत्यू झाला. तर संगमेश पुजारी,

अभिषेक पुजारी यांच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. दोन्ही जखमींना अहमदनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments