अहमदनगरताज्या बातम्यानेवासाराहाता

Uddhav Thackeray In Ahmednagar : उद्धव ठाकरेंचा अहमदनगर दौरा ! खास नेत्याच्या वाढदिवसाचे निमित्त…

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला आहे. शिंदे फडणवीस सरकार हे घटनाबाह्यरित्या स्थापन झाल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे

Uddhav Thackeray In Ahmednagar :- सर्वोच्च न्यायालयाने आज (११ मे) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल सुनावला आहे. न्यायालयाने शिंदे गट आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे काही निर्णय चुकीचे आणि बेकायदेशीर असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे.

राज्यपालांचं सगळे निर्णय चुकीचे होते. शिंदे गटाने भरत गोगावले यांची प्रतोदपदी केलेली नियुक्तीही बेकायदेशीर होती, असं न्यायालयाने म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना सत्तेत परत बोलावणं शक्य होतं. पण सध्याच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगणं योग्य नाही. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील, असंही न्यायालयाने म्हटलं.

अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर !
आज आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १२ मे रोजी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे आणि शनिशिंगणापूरमध्ये शनीचे दर्शन ते घेणार आहेत.

Advertisement

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची भेट ! निमित्त वाढदिवसाचं…
यासोबतच पडत्या काळात साथ दिलेले ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची ते भेट घेणार आहेत. गडाख यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यानिमित्त सोनईत आयोजित केलेल्या कार्यक्रमास ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

शिवसेनेचे निवडक नेते उपस्थित राहणार
उद्या सकाळी ठाकरे विमानाने शिर्डीला येणार आहेत. तेथून ते सोनईला जाणार आहेत. तेथे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची भेट घेणार आहेत. गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह शिवसेनेचे निवडक नेते उपस्थित राहणार आहेत.

गडाख आणि ठाकरे यांच्या भेटीला महत्व
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याच्यावेळी अपक्ष म्हणून निवडून आलेल्या शंकरराव गडाख यांनी सर्वप्रथम शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना जलसंधारण मंत्रीपद मिळाले होते.

Advertisement

पुढे शिवसेना फुटीच्यावेळीही गडाख ठाकरे यांच्यासोबत ठामपणे राहिले. मधल्या काळात ठाकरे यांच्यासमोरही अनेक अडचणी आल्या. मात्र, त्याही काळात ते ठाकरे यांच्यासोबतच राहिले. त्यामुळे गडाख आणि ठाकरे यांच्या भेटीला महत्व आहे.

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button