Saturday, February 24, 2024
Homeब्रेकिंगउध्दव ठाकरेंचे दौरे ही फक्त नौटकी, आता व्यक्तीद्वेषाची भाषणं शिल्लक

उध्दव ठाकरेंचे दौरे ही फक्त नौटकी, आता व्यक्तीद्वेषाची भाषणं शिल्लक

Ahmednagar News : उध्दव ठाकरे यांचे राज्यातील दौरे ही केवळ नौटंकी असून मुख्यमंत्री असतानाही कोकणातील जनतेच्या तोंडाला त्यांनी पाने पुसली होती.

पक्ष आणि आमदारही गमावलेल्यांकडे आता फक्त व्यक्तीद्वेशाची भाषणं शिल्लक आहेत. रोज सकाळी उठून बोलण्याचा संजय राऊतांचा वारसा आता उध्दव ठाकरेंनी स्वीकारला असल्याची टिका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली.

मंत्री विखे पाटील यांनी लोणी येथे आपल्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबाराच्या निमित्ताने नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, यापूर्वी सुध्दा उध्दव ठाकरे यांनी कोकणाचे दौरे केले. परंतु तेथील जनतेला ते काही देऊ शकले नाहीत.

आताही ते व्यक्तीव्देशाच्या भाषणांपलिकडे काहीही देऊ शकणार नाहीत. कारण सत्ता गेल्याच्या वैफल्याने ते ग्रासले आहेत. त्यामुळे त्यांचे व्यक्तीव्देशाची भाषा कोणालाही ऐकायला आता वेळ नाही.

राज्यातील त्यांचे दौरे ही फक्त नौटंकी असून, जनतेसाठी ठाकरे गटाकडे आता कोणताही कार्यक्रम शिल्लक राहिलेला नाही, जनतेलाही ते काही देऊ शकणार नाहीत.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विचारांनी वाढलेला पक्ष उध्दव ठाकरे यांनी केव्हाच गमावला. त्यांच्या पक्षाचे आमदारही त्यांना सोडून गेले.

त्यामुळे व्यक्तीव्देशाच्या भाषणा पलिकडे त्यांच्याकडे काहीही शिल्लक नाही. देशामध्ये इंडिया आघाडीकडे नेतृत्व करायला एकही नेता आता शिल्लक नाही.

प्रत्येकजण आता वेगळी भूमिका घेऊन इंडिया आघाडीतून बाहेर पडू लागला. इंडिया आघाडीने कितीही प्रयत्न केले तरी, देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला.

देशातील जनतेची काळजी करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व सक्षम आहे. इंडिया आघाडीचे उरले सुरले अस्तित्व आता संपलेले आहे.

वेगवेगळ्या राज्यात इंडिया आघाडीतील नेत्यांमध्येच मतप्रवाह उघड झाले असल्याने त्याची काळजी आघाडीच्या नेत्यांनी करावी, असा सल्ला मंत्री विखे यांनी दिला.

3 कोटी ११ लाख ६३ हजार २४१ कुटुंबांचे सर्व्हेक्षण पूर्ण

राज्यात मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्व महसुली विभागांत आतापर्यंत ३ कोटी ११ लाख ६३ हजार २४१ कुटुंबांचे सव्र्व्हेक्षण पूर्ण झाले.

आयोगाच्या निर्देशाप्रमाणे २ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत माहिती भरण्याचे काम सुरू राहणार आहे.

सर्व विभागांची यंत्रणा व महसूल विभागातील आधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्तम कार्यामुळेच हा डाटा उपलब्ध होऊ शकला. मराठा आरक्षणाच्या दृष्टीने ही माहिती उपयुक्त ठरेल, असा मंत्री विखे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments