दुर्दैवी: 15 लाखांसाठी विवाहितेचा छळ करून…

अहमदनगर- विवाहितेचा छळ होत असलेल्या अनेक घटना घडत आहेत. त्यात आणखी एक घटना समोर आली आहे. घर खरेदी करण्यासाठी माहेरहून 15 लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. तसेच तिला घरातून हाकलून दिले. याबाबत पती व सासू या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत 25 वर्षीय विवाहितेने राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, 31 मे 2019 रोजी विशाल घोडके सोबत विवाह झाला होता. दोन ते तीन महिने व्यवस्थित नांदवले. त्यानंतर पती व सासू यांनी नवीन घर खरेदी करण्यासाठी तू माहेरहून 15 लाख रुपये घेऊन ये. तेव्हा विवाहिता त्यांना म्हणाली, माझ्या वडिलांची परीस्थिती गरिबीची असल्याने ते इतके पैसे देऊ शकणार नाही.
तेव्हा पती व सासूने तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली. तसेच तीला उपाशीपोटी ठेवून तीचा शारीरीक व मानसीक छळ केला. जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच वारंवार पैशाची मागणी करून तीला घरातून बाहेर हाकलून दिले.
सासरच्या त्रासाला कंटाळून अखेर विवाहितेने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तीच्या फिर्यादीवरून आरोपी पती- विशाल दत्तात्रय घोडके, सासू- बेबी दत्तात्रय घोडके दोघे रा. केडगाव, अहमदनगर या दोघांवर गुन्हा रजि. नं. 106/2023 भादंवि कलम 498 (अ), 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.