अहमदनगर

दुर्दैवी: पाय घसरल्याने शेततळ्यात पडून शिक्षिकेचा मृत्यू

अहमदनगर – फिरण्यासाठी गेलेल्या शिक्षिकेचा पाय घसरून शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथे घडली. मनिषा महादेव मरकड (49) असे मयत शिक्षिकेचे नाव आहे. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनिषा मरकड या नेहमीप्रमाणे निवडुंगे गावाजवळ असलेल्या परिसरात फिरण्यासाठी गेल्या होत्या. या परिसरात असलेल्या एका शेततळ्यात पाय घसरून पडून त्यांचा शुक्रवारी (दि. 8) दुर्दैवी मृत्यू झाला.

शनिवारी संध्याकाळी उशिरा त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली. मयत मनिषा मरकड या मराठा विद्या प्रसारक मंडळ संचलित महात्मा गांधी विद्यालय, येळी येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. आज सकाळी पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button