अहमदनगर

दुर्दैवी घटना ! चुलीतील आगीच्या एका ठिणगीने संसाराची केली राखरांगोळी…

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार येथील सुदाम कोंडाजी मिसाळ यांच्या राहत्या पत्र्याच्या शेडला भीषण आग लागल्याची घटना घडली.

दरम्यान या भाषण आगीत मिसाळ यांचे रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे, धान्याची पोती व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.

यामुळे मिसाळ कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिवरगाव पठार गावांतर्गत असलेल्या मिसाळवस्ती येथे सुदाम मिसाळ हे राहत आहे.

पत्र्याच्या शेडमध्येच त्यांचे घर आहे. रविवारी ते काम आटोपून बाहेरगावी गेले होते. मात्र चुलीतील निखारा उडाल्याने काही क्षणातच पेट घेतला आणि आगीचे लोळ बाहेर निघाले.

आगीची घटना पाहताच शेजारी राहणाऱ्या महिलांनी आगीच्या दिशेने धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत शेडमध्ये असलेल्या पेटीतील रोख रक्कम 25 हजार रूपये, धान्याची पोती, केबल, पीव्हीसी पाईप, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.

या घटनेची माहिती समजताच तलाठी बी. एस. वैद्य, कोतवाल आसिफ शेख यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. जवळपास एक लाख रूपयांचे मिसाळ यांचे नुकसान झाले आहे. त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button