अहमदनगर

दुर्दैव : भिंत अंगावर पडून तीन तर झाड कोसळून महिला ठार ‘या’तालुक्यातील घटना

वादळी वाऱ्यात भिंत अंगावर पडून तीन जण ठार, तर दोन जण जखमी झाले, तर अंगावर झाड पडून महिला ठार झाल्याची घटना गुरुवार दि. ९ जुन रोजी दुपारी चार ते पाच वाजेच्या दरम्यान संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील मुंजेवाडी शिवारात घडली आहे.

अकलापूर गावांतर्गत मुंजेवाडी शिवारात विठ्ठल भिमाजी दुधवडे हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. गुरवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक जोरदार वादळी वारे सुटले व गारांचा पाऊसही पडु लागला. त्यामुळे दुधवडे कुटुंबासोबत घरात बसले होते.

अचानक वाऱ्याचा वेग वाढल्याने त्यांच्या घरावरील पत्रे उडून दूर जाऊन पडले. त्याच दरम्यान घराच्या भिंती अंगावर पडल्याने विठ्ठल भिमाजी दुधवडे (वय ७५), हौसाबाई भिमाजी दुधवडे (वय ६७) व साहील पिना दुधवडे (वय १०) यांचा घटनास्थळीचमृत्यू झाला.

तर वनिता पिना दुधवडे (वय ८), मंदाबाई विठ्ठल दुधवडे (वय ७०) हे जखमी झाले आहेत. तर दुसरी घटना संगमनेर तालुक्यातीलच मालदाड परिसरात घडली.

येथील परसराम नवले यांच्या शेतावर राहणाऱ्या सुरेखा राजु मधे या पाऊस आल्याने शेतमालाची आवराआवर करण्यासाठी गुरुवारी दुपारी साडेपाच वाजेच्या सुमारास गेल्या होत्या. त्याचवेळी वादळी वाऱ्यामुळे लिंबाचे झाड सुरेखा मधे यांच्या अंगावर पडले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button