दुचाकी आडवी लावून अज्ञात चोरट्यांनी मारहाण करून लुटले !

दुचाकी आडवी लावून अज्ञात चोरट्यांनी मारहाण करून दुचाकीस्वाराला लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील कचरू परसराम पवार यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.
याबाबत पवार यांनी फिर्यादित म्हटले की, मी दिनांक २६ मे रोजी माझी दुचाकीवरून खंडाळा येथे चाललो होतो. श्रीरामपूर रोडचे काम चालू असल्याने मी वार्ड नंबर २ मधून सुतगिरणीमार्गे एमआयडीसीमध्ये आलो.
एमआयडीसीमध्ये एसटी कार्यशाळेजवळ माझ्या दुचाकीतील पेट्रोल संपले म्हणून मोटारसायकल ढकलत पायी घेऊन जात असताना एका कंपनीजवळ माझ्या समोरून एका एचएफ डिलक्स मोटार सायकलवरून ३ अनोळखी इसम आले व त्यांनी माझ्या मोटार सायकलला त्यांची मोटार सायकल आडवी लावून मला थांबविले.
मला काही एक न विचारता लाथा बुक्यांनी मारहाण केली व ३२ हजार ४०० रूपये व काग्दपत्रे घेऊन शिवीगाळ करून हे तिघे मोटार सायकलवरून एमआयडीसी रोडने भरधाव वेगाने निघून गेले. चोरी करणाऱ्या इसमांपैकी एकजण शरीराने जाड होता व त्याची उंची ५ फुट होती. दोन इसम सडपातळ होते.
त्यापैकी एकाची दाढी वाढलेली व अंगात टी-शर्ट व जिन्स पँट होती. या बाबत श्रीरामपूर शहर पोलिसांनी अज्ञात तीन इसमांविरूद्ध भा.दं.वि. कलम ३९४, ३४१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.