अहमदनगर
अज्ञात वाहन-दुचाकीची धडक; एक ठार

Advertisement
अहमदनगर- अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. विनायक पोपट आवारे (रा. उंबरे ता. राहुरी) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. निंबळक (ता. नगर) शिवारात चौधरी धाब्याजवळ ही घटना घडली.
याप्रकरणी राहुल विनायक आवारे (वय 28) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
Advertisement
विनायक आवारे त्यांच्या दुचाकीवरून निंबळक बायपास रोडने जात असताना चौधरी धाब्यासमोर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रविवार, 8 ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत.
Advertisement