अहमदनगर
Ahmednagar Kanda Price : कांद्याची 88 हजार गोण्या आवक भाव ‘इतक्या’ हजारापर्यंत !

नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या आवकेत मोठी वाढ झाली. काल शनिवारी 88 हजार 238 गोण्या (48 हजार 133 क्विंटल) कांद्याची आवक झाली.
जास्तीत जास्त भाव दिड हजारापर्यंत स्थिर होते. काल शनिवारी बुधवारच्या तुलनेत 24 हजार गोण्यांनी आवक वाढली. एक-दोन लॉटला 1400 ते 1500 रुपयांपर्यंत भाव मिळाला.
मोठ्या कलरपत्ती कांद्याला 1200 ते 1300 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1100 ते 1200 रुपये, गोल्टा कांद्याला 900 ते 1100 रुपये, गोल्टी कांद्याला 300 ते 700 रुपये, जोड 200 ते 450 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला 100 ते 400 रुपये इतका भाव मिळाला.