अहमदनगरबाजारभाव

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी कांदा 1450 रुपयांपर्यंत !

नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या भावात वाढ सुरुच असून बुधवारी भावात आणखी 100 रुपयांनी वाढ झाल्याने जास्तीत जास्त भाव 1450 रुपयांपर्यंत निघाला.

आवकेतही जवळपास 4 हजार गोण्यांनी वाढ झाली. एकूण 39 हजार 702 गोण्या (21 हजार 689 क्विंटल) इतकी वाढ झाली.एक-दोन लॉटला 1200 ते 1450 रुपयांचा भाव मिळाला.

मोठा कलरपत्ती कांद्याला 1100 ते 1250 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1000 ते 1050 रुपये, गोल्टा कांद्याला 900 ते 1000 रुपये, गोल्टी कांद्याला 300 ते 700 रुपये, जोड कांद्याला 200 ते 450 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला 100 ते 400 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button