ताज्या बातम्या

Upcoming Car September 2023 : वाहनक्षेत्रासाठी सप्टेंबर असणार खास! लॉन्च होणार या दोन शक्तिशाली कार, ह्युंदाई क्रेटाला देणार टक्कर

भारतीय ऑटो बाजारात सप्टेंबर महिन्यामध्ये आणखी दोन एसयूव्ही कार दाखल होणार आहेत. तसेच या कारच्या किमती देखील कमी असणार आहेत त्यामुळे कमी बजेट असणाऱ्यांना या एसयूव्ही कार उत्तम ठरू शकतात.

Upcoming Car September 2023 : तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण भारतीय ऑटो बाजारात सप्टेंबर महिन्यामध्ये कमी बजेट असणाऱ्यांसाठी आणखी दोन कार लॉन्च होणार आहेत.

ज्या ग्राहकांची रेंज 10-12 लाखांच्या आसपास आहे त्यांच्या या नवीन कार सर्वोत्तम ठरू शकतात. या नवीन कार ह्युंदाई क्रेटाला टक्कर देतील असा दावा देखील करण्यात येत आहे. त्यामुळे आता भारतीय ऑटो बाजारात आणखी दोन एसयूव्ही कार दाखल होणार आहेत.

चला तर जाणून घेऊया आगामी एसयूव्ही कारबद्दल…

CITROEN C3 एअरक्रॉस

CITROEN कंपनीकडून त्यांची C3 Aircross ही कार एप्रिल महिन्यामध्ये सादर केली आहे. मात्र या कारच्या किमतीबद्दल कंपनीकडून किमतीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

CITROEN C3 एअरक्रॉस ही कार सप्टेंबरपूर्वी लॉन्च केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कारमध्ये 1.2-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात येणार आहे. हे इंजिन 110 hp पॉवर आणि 190 Nm टॉर्क जनरेट करते.

सुरुवातीला कंपनीकडून त्यांची C3 एअरक्रॉस ही कार 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह देण्यात येणार आहे. तसेच त्यानंतर कंपनीकडून ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह ही कार दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. CITROEN C3 एअरक्रॉस या हॅचबॅक कारमध्ये 10-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट देण्यात येणार आहे.

होंडा एलिव्हेट

होंडा कंपनीकडून त्यांची आणखी एक आगामी एसयूव्ही जून महिन्यात भारतीय ऑटो बाजारात सादर केली आहे. Honda Elevate असे या एसयूव्हीचे नाव आहे. सप्टेंबरपूर्वी ही कार देखील भारतीय ऑटो बाजारात लॉन्च केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एलिव्हेट कारमध्ये 1.5-लिटर, 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 119 bhp @ 6,600 rpm आणि 145 Nm @ 4,300 rpm जनरेट करते. तसेच या कारची इलेक्ट्रिक आवृत्ती देखील पुढील ३ वर्षात सादर केली जाऊ शकते यावर कंपनीकडून काम सुरु करण्यात आले आहे.

होंडा एलिव्हेट या कारला देणार टक्कर

होंडा कंपनीची Elevate ही एसयूव्ही कार Hyundai Creta, Kia Seltos, Maruti Grand Vitara, Toyota Hyryder, Volkswagen Taigun, Citroën C3 Aircross, Skoda Kushaq आणि MG Astor या एसयूव्ही कारला टक्कर देईल असे सांगण्यात येत आहे.

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button