Upcoming Cars 2023 : भारतीय बाजारात जुलै महिन्यात दाखल होणार या ३ भन्नाट कार, जाणून घ्या फीचर्स
ऑटो बाजारात आता पुन्हा एकदा ३ नवीन कार पुढील महिन्यात लॉन्च होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना पुन्हा एकदा नवीन कार खरेदी करण्याचा पर्याय मिळणार आहे.

Upcoming Cars 2023 : भारतीय ऑटो बाजारात अनेक कंपन्यांच्या नवीन कार दाखल होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना आणखी नवीन कार खरेदी करण्याचा पर्याय मिळणार आहे. पुढील जुलै महिन्यामध्ये या नवीन कार लॉन्च होणार आहेत.
पुढील महिन्यामध्ये मारुती सुझुकी कंपनीची इनव्हिक्टो तसेच ह्युंदाई एक्स्टर आणि किआ सेल्टोस फेसलिफ्ट होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना नवीन कार खरेदी करताना आणखी या नवीन कारचे पर्याय उपलब्ध होणार आहेत.
पुढील आगामी काळात अनेक नवीन कार लॉन्च होणार आहेत मात्र आता सध्या या तीन कारची नवे जुलै महिन्यामध्ये लॉन्च होणार असल्याचे बोलले जात आहे. चला तर जाणून घेऊया या नवीन कारविषयी.
ह्युंदाई एक्स्टर
Hyundai कंपनीकडून लवकरच त्यांच्या ग्राहकांना आणखी एक नवीन शक्तिशाली आणि दमदार फीचर्स असलेली कार उपलब्ध करून दिली जाणार आहे. पुढील महिन्यामध्ये कंपनीकडून Xeter ही नवीन SUV कार लॉन्च केली जाणार आहे. या कारच्या लॉन्च करण्याची तारीख १० जुलै ठेवण्यात आली आहे.
या कारमध्ये कंपनीकडून अनेक धमाकेदार वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. या कारमध्ये ग्राहकांना सीएनजी किट देखील उपलब्ध असेल. तसेच या कारमध्ये यात इलेक्ट्रिक सनरूफ, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कनेक्टेड टेक्नॉलॉजी आणि क्रूझ कंट्रोल सारखी उत्कृष्ट फीचर्स दिलेले आहेत. Xeter कार ही टाटा पंच आणि Citroën C3 शी थेट स्पर्धा करेल असा दावा करण्यात येत आहे.
मारुती सुझुकी इनव्हिक्टो
मारुती सुझुकी कंपनीकडून ग्राहकांना आता आणखी एक कार उपलब्ध करून दिली जाणार आहे. या कारचे नाव मारुती सुझुकी इनव्हिक्टो आहे. ५ जुलै रोजी कंपनीकडून ही MPV कार लॉन्च केली जाणार आहे. ही कार मारुती टोयोटाच्या इनोव्हा हायक्रॉसची रिबॅज केलेली आवृत्ती असणार आहे.
या कारचे बुकिंग आजपासून म्हणजेच १९ जूनपासून सुरु करण्यात आले आहे. अशी अपेक्षा आहे की ही कार 2.0l पेट्रोल आणि 2.0l स्ट्राँग हायब्रिड पेट्रोल पर्यायासह लॉन्च केली जाऊ शकते.
तसेच या कारची किंमत इनोव्हा हायक्रॉसपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मारुती सुझुकी पहिल्यांदाच त्यांची सर्वात महागडी कार लॉन्च करणार असल्याचे दिसत आहे.
किआ सेल्टोस फेसलिफ्ट
भारतीय ऑटो बाजारात किआ सेल्टोस फेसलिफ्टची विक्री ऑगस्ट महिन्यापासून सुरु होणार आहे. कंपनीकडून या कारमध्ये फारसा असा काही बदल करण्यात आला नसल्याचे बोलले जात आहे.
किआ सेल्टोस कारमध्ये कंपनीकडून थोडेसे बदल करून पुन्हा लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. या कारमध्ये बाहेरील केबिनला पुन्हा डिझाइन करण्यात आले आहे. पॅनोरामिक सनरूफ, एडीएएस टेक्नॉलॉजी सारखी वैशिष्ट्ये देखील यामध्ये देण्यात आली आहेत.