अहमदनगर

अर्बन बँक दीडशे कोटीचे फसवणूक प्रकरण; पोलिसांकडून मुख्य शाखेत मोठी कारवाई

अहमदनगर- नगर अर्बन बँकेतील सुमारे दीडशे कोटींच्या फसवणूकीच्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेने वैधानिक लेखापरीक्षकांच्या उपस्थितीत येथील मुख्य शाखेत झाडाझडती घेतली. पोलिसांनी संशयित कर्ज प्रकरणांच्या फायली व फसवणुकीशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत.

 

मागील तीन दिवसांपासून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर अर्बन बँकेमध्ये तपासणी मोहीम सुरू केली आहे. या तपासणी दरम्यान आक्षेप घेण्यात आलेल्या कर्ज प्रकरणांसह इतरही काही कर्ज प्रकरणांच्या संशयित फायली व काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. शुक्रवारी सायंकाळपर्यंत गुन्हे शाखेच्या पथकाकडून ही तपासणी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर सर्व कागदपत्रे जप्त करून ती ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

 

नगर अर्बन बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयास्पद कर्ज प्रकरण व कर्ज प्रकरणातील घोटाळे या संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून याचा तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार ‘अर्बन’ च्या या सर्व गैरव्यवहाराचे फॉरेन्सिक ऑडिट केले जाणार आहे. त्यासाठी वैधानिक लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button