Vastu Tips : घरात चुकूनही लावू नका ही ५ झाडे, अन्यथा होईल आर्थिक नुकसान
तुम्ही तुमचे घर आकर्षक दिसण्यासाठी जर घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावत असाल तर जरा थांबा. कारण वास्तुशाश्त्रात घरात झाडे ठेवण्याबद्दल अनेक नियम सांगण्यात आले आहेत.

Vastu Tips : आजकाल अनेकजण नवीन घरामध्ये घराची सजावट करण्यासाठी किंवा घर आकर्षक दिसण्यासाठी अनेक प्रकारची झाडे लावत असतात. तसेच घराच्या आसपास देखील झाडे लावली जातात. झाडामुळे ऑक्सिजनची पातळी राखण्यात मदत होत असते.
मात्र काहीवेळा घरामध्ये किंवा घरच्या आसपास काही प्रकारची झाडे लावणे तुमच्यासाठी अशुभ ठरू शकतात. तुम्ही तुमच्या घरामध्ये जर घर आकर्षक दिसण्यासाठी काही झाडे लावत असाल तर जरा थांबा.
वास्तू शाश्त्रामध्ये घराबद्दल आणि घरामध्ये कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या ठेऊ नयेत याबद्दल अनेक नियम सांगितले आहेत. जर तुम्ही खालील झाडे घरामध्ये लावत असाल तर तुमच्या घरात दारिद्र्य येऊ शकते.
खजूर
जर तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा घराबाहेर खजूराचे झाड लावले तर तुमच्या घरामध्ये दारिद्र्यता येऊ शकते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या आसपास किंवा घरामध्ये खजुराचे झाड लावू नये. या झाडामध्ये अनुकूलता नसते. हे झाड नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते त्यामुळे तुमच्या घरात गरिबी येऊ शकते.
निवडुंग
अनेकजण त्यांच्या घरामध्ये निवडुंगाचे झाड लावत असतात किंवा ते शो साठी ते ठेवत असतात. जर तुम्हीही असे करत असाल तर तुमच्या घरामध्ये आर्थिक प्रगती होणार नाही. तसेच पैसाही वाया जाईल. जर तुमच्या घरात हे झाड असेल तर ते आजच फेकून द्या.
बेरी
जर तुम्ही तुमच्या घरामध्ये बेरीचे झाड लावले असेल तर ते आजच काढून टाका. या झाडामुळे आर्थिक आणि कौटुंबिक प्रभाव वाढू शकतो. या झाडामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
चिंच
चिंचेचे झाड तुम्हाला अनेकांच्या घराबाहेर पाहायला मिळते किंवा ते तुमच्या देखील घराबाहेर किंवा अंगणात असेल. चिंचेचे झाड नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. तसेच तुमच्या घरातील सदस्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो.
बांबू
घर आकर्षक दिसावे यासाठी आजकाल अनेकजण घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावत असतात. मात्र हीच झाडे तुमचे आर्थिक नुकसान करू शकतात. तुम्हीही घरात बांबूचे झाड लावले असेल तर ते आजच टाकून द्या. हे झाड घरामद्ये लावणे अशुभ मानले जाते. असे झाड तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.