Vastu Tips : सावधान! घरामध्ये मनी प्लांट लावताना चुकूनही करू नका या चुका, अन्यथा घरात येईल गरिबी
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मनी प्लांट लावताना अनेक चुका केल्या जातात. त्यांच्या याच चुका त्यांना आर्थिक समस्यांच्या उंबरठ्यावर आणत असतात. त्यामुळे काही चुका करणे तुमच्यासाठी महागात पडू शकते.

Vastu Tips : घरामध्ये वावरत असताना अनेकजण वास्तुशास्त्राविरुद्ध चुका करत असतात. त्यामुळे घरामध्ये सतत पैशांच्या समस्या निर्माण होत असतात. जर तुम्ही वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काही नियम पळाले तर तुम्हाला कसलीच समस्या निर्माण होणार नाही.
हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्व आहे. त्यामुळे नवीन घर किंवा कोणतीही नवीन वास्तू बांधताना वास्तुशास्त्रानुसार बांधणे गरजेचे आहे. जर तुम्ही नवीन घर बांधताना वास्तुशास्त्रानुसार बांधले नाही तर तुम्हालाही अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
घरामध्ये घराची शोभा वाढवण्यासाठी अनेक प्रकारची छोटी छोटी झाडे लावली जातात. मात्र काही प्रकारची झाडे घरामध्ये लावणे देखील तुम्हाला महागात पडू शकते. तसेच ती झाडे योग्य दिशेला ठेवणे देखील आवश्यक असते.
वास्तुशास्त्रानुसार तुळशी, शमी, मनी प्लांट अशी झाडे घरामध्ये लावणे शुभ मानले जाते. मर ही झाडे लावताना त्यांची योग्य काळजी घेणे देखील आवश्यक आहे. तसेच ही झाडे ठेवताना योग्य दिशा निवडणे देखील महत्वाचे आहे.
घरामध्ये मनी प्लांट लावणे शुभ मानले जाते. घरामध्ये मनी प्लांट लावल्याने देवी लक्ष्मी माता प्रसन्न होते. तसेच घरामध्ये सुख समृद्धी देखील नांदते. मात्र मनी प्लांट घरामध्ये लावताना काळजी घेणे गरजेचे आहे.
1. या दिशेला लावू नका
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मनी प्लांट लावताना योग्य दिशा निवडणे आवश्यक आहे. ईशान्य दिशेला कधीही मनी प्लांट ठेऊ नये. ही दिशा बृहस्पति दर्शवते आणि ती शुक्राची शत्रू मानली जाते.
त्यामुळे या दिशेला मनी प्लांट ठेवणे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकते. तसेच पश्चिम आणि पूर्व दिशेलाही मनी प्लांट लावू नये. या दिशेला मनी प्लांट लावणे घरातील व्यक्तीला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.
2. आग्नेय दिशेला लावा
जर तुम्ही घरामध्ये मनी प्लांट लावत असाल तर वास्तुशाश्त्रानुसार आग्नेय दिशेला लावा. या दिशेला मनी प्लांट लावणे शुभ मानले जाते. त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते. तसेच आर्थिक समस्या देखील निर्माण होत नाही.
3. जमिनीला स्पर्श करू नका
घरामध्ये मनी प्लांट लावताना जमैनाला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या. मनी प्लांट लावताना जमिनीला स्पर्श होणे अशुभ मानले जाते. त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन घरामध्ये अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
4. कधीही सुकू देऊ नका
घरामध्ये मनी प्लांट लावत असाल तर वास्तुशाश्त्रानुसार ते कधीही सुकू देऊ नका. त्याची योग्य प्रकारे काळजी घ्या. मनी प्लांट सुकू देणे अशुभ मानले जाते. यामुळे घरामध्ये धनहानी देखील होऊ शकते.