Vastu Tips : पूर्व दिशेला घराचे तोंड असणे शुभ आहे की अशुभ? जाणून घ्या वास्तू नियम काय सांगतो
घराचे नवीन बांधकाम करत असताना ते वास्तू शास्त्रानुसार बांधणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही वास्तू शास्त्रानुसार घराचे बांधकाम केले तर तुमच्यासाठी ते फायद्याचे ठरू शकते.

Vastu Tips : घर बांधताना अनेकजण वास्तू शास्त्रानुसार घर बांधत असतात. तसेच काहीजण वास्तुशाश्त्रानुसार घर बांधत नाहीत. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये अनेक समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे नेहमी घर बांधत असताना वास्तू शास्त्रात सांगण्यात आलेल्या नियमाप्रमाणेच घर बांधावे.
घर बांधत असताना त्याचे तोंड योग्य दिसेल करणे आवश्यक आहे. कारण जर तुम्ही असे न केल्यास तुमच्या देखील घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. आणि घरामध्ये अनेक समस्या निर्माण होऊन तुमच्या शुभ कामात अडथळे निर्माण होऊ शकतात.
वास्तुशास्त्रात बेडरूमपासून घराच्या स्वयंपाक घरापर्यंतची दिशा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे यानुसारच तुम्ही घराचे बांधकाम करावे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये वातावरण देखील चांगले राहू शकते.
मंदिर याच दिशेला असावे
जर तुम्ही तुमचे नवीन घर पूर्व दिशेला तोंड करून बांधले तर ते तुमच्यासाठी शुभ मानले जाते. कारण या दिशेने सूर्यकिरणे तुमच्या घराच्या आतमध्ये येत असतात. तसेच तुमच्या घरातील देवघर ईशान्य कोपर्यात असावे. प्रवेशद्वारावर तांब्याचा सूर्य लावा. वास्तुशास्त्रानुसार तांब्याचा सूर्य सुख आणि समृद्धी घरामध्ये कायम ठेवत असतात.
स्वयंपाकघरातील वास्तु नियम
घर बांधत असताना अनेकजण स्वयंपाक घर चुकीच्या दिशेला घेत असतात. मात्र असे करणे तुमच्यासाठी अशुभ ठरू शकते. कारण घरामधील स्वयंपाक घर हा एक महत्वाचा विषय मानला जातो. स्वयंपाक घराचे तोंड नेहमी उत्तर किंवा पश्चिम दिशेला असावे.
या दिशेने पायऱ्या असणे आवश्यक आहे
घराच्या पूर्व दिशेला नेहमी जिना असणे आवश्यक आहे. घराच्या उत्तर-पूर्व कोपऱ्यात जेथे प्रवेशद्वार पूर्व दिशेला असेल तेथे स्नानगृह बांधू नये. तसेच तुम्ही यासाठी दक्षिण किंवा पश्चिम दिशा निवडू शकता.
बेडरूम कुठे असावी
नवीन घराचे बांधकाम करत असताना घर नेहमी पूर्व दिशेला तोंड करून बांधणे शुभ मानले जाते. तसेच घराची बेडरूम दक्षिण-पश्चिम दिशेला असणे शुभ मानले जाते. तुम्ही जर अशा प्रकारे घर बांधले तर ते तुमच्यासाठी शुभ मानले जाते.