अहमदनगर मध्ये भाजीपाला वधारला : लसूण २०० तर गवार १०० रूपये किलो
लसूण आणि हिरव्या मिरच्या, गवारचेही दर वाढले आहेत. परिणामी ऐन श्रावण महिन्यात गृहिणींचे बजेट कोलमडले असून हॉटेल व्यावसायिकही त्रस्त झाले आहेत.

राज्यात पाऊस लांबल्याने तर इतर राज्यात अतिवृष्टी झाल्याने भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. याचा बाजारपेठेतील भाज्यांच्या किमतींवर परिणाम झाला असून आता आले,
लसूण आणि हिरव्या मिरच्या, गवारचेही दर वाढले आहेत. परिणामी ऐन श्रावण महिन्यात गृहिणींचे बजेट कोलमडले असून हॉटेल व्यावसायिकही त्रस्त झाले आहेत.
अवकाळी पावसानंतर परत दिलेल्या हुलकावणीमुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील शेतकरी पावसाची वाट पाहात आहेत. पावसाने ओढ दिल्याने त्याचा जबर फटका भाजीपाल्याला बसला असून राज्यातील आवक घटली आहे.
पावसाळा संपत आता असून अद्यापही समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे अल्प पावसावर आलेली पिके तर वाया गेली आहेत. तर पुरेसा पाऊस न झाल्याने नदी नाले कोरडे असून विहिरीतील पाणी देखील संपत आले आहे.
त्यामुळे यापुढील काळातील पिकांचे देखील भवितव्य धोक्यात असल्याचे चिंताजनक चित्र दिसत आहे. विपरीत हवामानाचा फटका बसल्याने टोमॅटोला कधी नव्हे ते अच्छे दिन आले होते.
मात्र पुन्हा एकदा टोमॅटोचे दर स्थिर होण्यास तर काही ठिकाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. टोमॅटोच्या दरात घट होत असताना लसणाचे भाव वाढत आहेत. फोडणी आणि तडका महाग झाल्याने त्याचा परिणाम जेवणाच्या थाळीवर होणार असल्याचं दिसत आहे.
सध्या ठोक बाजारात लसणाचा दर प्रतिकिलो १९० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
अहमदनगर बाजार समितीत मिळालेले दर : टोमॅटो ५०० – २०००, वांगी ५०० – ३०००, फ्लावर ७०० २०००, कोबी ५०० – १२००, काकडी २००-१०००, गवार ४०००-९०००,घोसाळे १५००- ३५००, दोडका १००० – ३०००,कारले १००० – ३०००, भेंडी १०००- ३०००,वाल १५०० ३०००, घेवडा ८०० – २५००,तोंडुळे २०००-३०००, बटाटे १४०० – २०००, लसूण ७००० – १९०००, हिरवी मिरची २००० – ३०००, शेवगा २००० – २३००, भु. शेंग ५००० – ५५००, लिंबू ५००-२०००, आद्रक ५००० – १३,५००, गाजर २०००- २२००, दू. भोपळा ५०० १३००, शि. मिरची ८०० – २०००, मेथी १६००-२४००, कोथिंबीर ६०० – ८००, पालक १४००-२०००, शेपू भाजी ८०० – ८००, चवळी २०००-२०००, बीट २०००-७०००, कांदा पात १००० १७००.