विखे पाटील VS राम शिंदे : खासदार सुजय विखे पाटील म्हणाले, ‘महाराष्ट्र या गोष्टीचा साक्षीदार …

Vikhe Patil VS Ram Shinde :- विखे ज्या पक्षात जातात त्या विरोधात काम करतात. असे थेट आरोप करत भाजपचेच आ. राम शिंदे यांनी विखेंना घरचा आहेर दिला आहे. जामखेड बाजार समिती निवडणुकीत ईश्वर चिठ्ठीचा कौल आ. राम शिंदे यांच्या गटाला मिळून सभापतिपदी शरद कार्ले हे निवडून आले आहेत.
जामखेड बाजार समिती सभापती निवडीनंतर आ. राम शिंदे हे प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी हे आरोप केले. या निवडणुकीत विखे पिता पुत्रांनी आ. रोहित पवार यांना मदत केल्याचे आरोप त्यांनी केले आहेत.
निवडणुकीत आम्ही पूर्ण मदत करू, असे आश्वासन विखे पाटील यांनी दिले होते. आम्ही त्यांना उमेदवारी देतो म्हणून सांगितले, पण त्यांनी पहिल्याच दिवसापासून आम्हाला विरोध केला. त्यांनी आमच्या विरोधात उपसभापतीसाठी फॉर्म भरला असे चित्र मला बघायला मिळाले.
आमच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांंनी खुप मेहनत घेतली. जिल्हा बँकेच्या संचालका विरोधात लढलो. परंतु आमच्याच भाजपाचे खासदार सुजय विखे विरोधात लढले. शेवटी लोकांनी आम्हालाच कौल दिला.
भाजपाने खासदार केले, आमदार केले, महसूलमंत्री केले अशा पद्धतीने त्यांना काय हवे होते ते दिले. कार्यकत्यार्ंच्या निवडणुकीत असे त्यांनी वागणे गैर आहे. मी नेतृत्वाला व पक्षाच्या वरिष्ठांना देखील हा विषय सांगितला आहे, असे आ. राम शिंदे बोलले.
दरम्यान आज ह्याबद्दल बोलताना खासदार सुजय विखे पाटील म्हणाले, ‘महाराष्ट्र या गोष्टीचा साक्षीदार आहे की गेल्या तीस वर्षांपासून आमच्या परिवाराचा पवार कुटुंबियांशी राजकीय संघर्ष सुरू आहे.
इंटरनेवर शोध घेतला तरी याची बरीच विश्लेषणेही तुम्हाला मिळतील,’ अशा शब्दांत विखे पाटील यांनी छुप्या युतीचा आरोप फेटाळून लावला. सोबतच पवार कुटुंबियांशी असलेल्या राजकीय वैरासंबंधीही प्रथमच स्पष्टपणे भाष्य केले आहे.
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर भाजपच्या नेत्यांमध्ये हा वाद सुरू झाला आहे. प्रा. शिंदे यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले, ‘शिंदे यांच्या मनात काय नाराजी आहे, हे सांगता येणार नाही.
त्यांनी पक्षाकडे तक्रार केली असेल तर पक्ष श्रेष्ठी दोघांनाही बोलावून घेतील. तेथे आम्हीही बाजू मांडू. निवडणुकांमध्ये अशी थोडीफार नाराजी होतच असते. नंतर चर्चेतून प्रश्न सुटतात’.