अहमदनगर

गावठी कट्टा घेऊन एमआयडीसीत करत होता दहशत; पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर- खंडाळा (ता.श्रीरामपूर) एमआयडीसी परिसरात गावठी कट्टा घेऊन दहशत करणाऱ्या तरूणाला पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्याच्याजवळून एक 40,000/- रुपये किंमतीचा गावठी कट्टा व 1,000/- रु किंमतीचे दोन जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रईस शेरखान पठाण असं त्यांचं नाव आहे.

 

आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने यास तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. खंडाळा एमआयडीसीमध्ये काळे डेअरीचे जवळ एक तरुण हातात गावठी कट्टा घेऊन दहशत करत असल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक, राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी, संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचेकडील तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेखा देवरे, पोलीस नाईक साईनाथ राशिनकर, रघुनाथ कारखेले, मच्छिंद्र शेलार, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, राहुल नरवडे, रमिझराजा अत्तार, गणेश गावडे, मच्छिद्र कातखडे, गौरव दुर्गुळे, तुषार गायकवाड, बाळासाहेब गुंजाळ, ज्ञानेश्वर गुंजाळ, अंबादास आंधळे अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील पोलीस नाईक फुरकान शेख व पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद जाधव या पथकाने एमआयडीसीत जावून त्या इसमास पाठलाग करुन त्यास पकडले. त्याची झडती घेतली असता त्याचे जवळ एक 40 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व 1 हजार रु किंमतीचे दोन जिवंत काडतुस मिळुन आली आहेत. सदर आरोपी रईस शेरखान पठाण (वय 30) रा. रांजणखोल, ता. राहाता, येथील आहे.

 

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 80/2023 नुसार रईस शेरखान पठाण याचेविरुध्द आर्म अ‍ॅक्ट कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने रईस शेरखान पठाण यास तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button