अवैद्य उत्खनन व ब्लास्टिंग थांबवण्याची गावकऱ्यांची मागणी

देहरे येथील वांबोरी रोड येथे चालू असलेले अवैद्य उत्खनन थांबवण्याची मागणी गावकऱ्यांनी अनेक वेळा करून देखील बंद झालेले नसून त्या निषेधार्थ जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
अवैध करिता उत्खनन चालू आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बोरवेल ब्लास्टिंग केले जात आहे 50 फूट खोल जमिनीत हे ब्लास्टिंग होत असल्यामुळे शेजारी 150 ते 200 मीटर अंतरावर आमचे राहते घर जमिनीला हादरे बसत असून घरे पडण्याची भीती वाटत आहे
यापूर्वी 8 डिसेंबर 2021 रोजी ब्लास्टिंग केल्यानंतर आमच्या शेतातील घरावर दगडे पडले व त्यात एक महिला गंभीर जखमी झाली त्यामुळे घराच्या वरती व पत्रावर दगड पडून पत्र्याचा शेड तुटला असून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे
व आमच्या संपूर्ण परिसरामध्ये धुळीचे साम्राज्य झाले असून पिकाचे नुकसान होत आहे व आमच्या आरोग्याला देखील धोका निर्माण झाला आहे
त्यामुळे ग्रामस्थांनी समज देऊनही ब्लास्टिंग चालू आहे तरी भविष्यात जीवितहानी झाल्यास या सर्व गोष्टीचा जबाबदार कोण?
देखील लवकरात लवकर या कंपनीवर कारवाई करून अवैध उत्खनन थांबवण्याची मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.
माहितीसाठी. मो. 9762926220.