Shirdi News : साई संस्थान विरोधात ग्रामस्थ आंदोलन करणार देशभर साई मंदिर; निर्णयाला विरोध
संस्थानच्या निर्णयाविरोधात माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी आंदोलनाचा तर माजी नगराध्यक्षा अनिता जगताप व विजय जगताप यांनी ५ ऑक्टोबरपासून उपोषणाचा निर्णय घेतला आहे. संस्थानचे माजी विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकरही आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

शिर्डीतच अनेक समस्या असताना साईसंस्थानने देशभर साईमंदिर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या विरोधात ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याने संस्थानचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत.
संस्थानच्या निर्णयाविरोधात माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी आंदोलनाचा तर माजी नगराध्यक्षा अनिता जगताप व विजय जगताप यांनी ५ ऑक्टोबरपासून उपोषणाचा निर्णय घेतला आहे. संस्थानचे माजी विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकरही आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
साईसंस्थानला एखाद्या राज्याने किंवा संस्थेने पाच एकर जागा दिल्यास संस्थान तेथे शिर्डीसारखे मंदिर उभारणार आहे. तसेच तेथे अन्नदान, रुग्णसेवा आदी उपक्रमही राबविणार आहे. मंदिर बांधण्यासाठी ५० लाखांपर्यंत मदत करणार आहे.
साईमंदिराची असोसिएशन काढण्यासारखे काही विचाराधीन निर्णय साईसंस्थानचे सीईओ पी. शिवाशंकर यांनी (दि.२६) सप्टेंबर रोजी जाहीर केले आहेत.
साईंच्या प्रचार-प्रसारासाठी हा निर्णय असल्याचा दावा संस्थानकडून करण्यात येतो. संस्थान या निर्णयावर ग्रामस्थांचे एकमत घडून आणण्यासाठी ग्रामस्थांची बैठक घेणार असल्याचेही जाहिर केले. मात्र संस्थानने घेतलेल्या या निर्णयाचे पडसाद आता शिर्डीसह साई भक्तांमध्ये उमटू लागले आहे.
संस्थानच्या या निर्णयाला विरोध असल्याच्या पोस्ट समाजमाध्यमावर जळकत आहेत. त्यातच माजी नगराध्यक्ष तसेच संस्थानच्या कार्यकारी मंडळावर असणाऱ्या काही माजी सदस्यांनीही विरोधाचा सुर लावला आहे. एकुणच ग्रामस्थांच्या बैठकी आधिच संस्थानच्या या निर्णयाला विरोध होऊ लागल्याने हे लोन वाढण्याचीच चिन्हे निर्माण झाली आहेत.