Home अहमदनगर … त्या घरातील दोन व्यक्तीला आमच्या खर्चाने आयोध्येला घेवुन जावु : खा....

… त्या घरातील दोन व्यक्तीला आमच्या खर्चाने आयोध्येला घेवुन जावु : खा. विखे

0
75
Ahmednagar News
Ahmednagar News

Ahmednagar News : प्रभुरामचंद्र आपल्या आस्थेचा विषय आहे. ज्या घरातील दि.२२ जानेवारीची सजावट उत्तम असेल, त्या घरातील दोन व्यक्तीला आमच्या खर्चाने आयोध्येला घेवुन जावु.

स्पर्धेत विजयी व्हा, आणि आयोध्येची वारी करा असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे यांनी शहरवासीयांना केले आहे.

येथील स्वर्गीय माधवराव निहाळी सभागृहामधे आयोजित साखर वाटप कार्यक्रम व विविधविकासकामाचे भुमीपुजन समारंभात विखे बोलत होते.

यावेळी आमदार मोनिका राजळे, अभय आव्हाड, संजय बडे, सुभाष बर्डे, नंदकुमार शेळके, बजरंग घोडके, मंगल कोकाटे, सिंधुताई साठे,

भारती असलकर, प्रविम राजगुरु, अशोक मंत्री, डॉ. सुहास उरणकर, सुनिल ओव्हळ, प्रतिक केडकर, प्रशांत शेळके, रामनाथ बंग, अजय रक्ताटे, नारायण पालवे, महेश बोरुडे, मुकुंद लोहीया उपस्थीत होते.

यावेळी बोलताना आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, विकासाची कामे शहरात केलेली आहेत. खासदार डॉ. सुजय विखे व मी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनेतुन निधी दिलेला आहे. दि.२२ जानेवारीला आपला सण आहे.

प्रभु रामचंद्र खुप वर्षानंतर आयोध्येत पुन्हा आगमान करीत आहेत. त्यांचे स्वागत प्रत्येक गावात झाले पाहीजे. भव्यदिव्य सोहळा सण म्हणुन सर्वाथाने चांगला झाला पाहीजे. राम मंदिराचे निर्माण नरेंद्र मोदी व साधुसंताच्या आशिवार्दाने झाले आहे.

आपले साधुसंत मोदीजींनी आयोध्येला बोलावुन घेतले आहेत. प्रभु रामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठा होताना आपणही उत्साहात सण करावा. डॉ. मृत्युंजय गर्जे यांनी प्रस्ताविक केले. प्रतिक खेडकर यांनी आभार मानले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here