अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: जुन्या वादातून एकावर शस्त्राने हल्ला; ठार मारण्याचा प्रयत्न

जुन्या भांडणाच्या कारणातून एकाला कुर्‍हाड, काठी व लोखंडी धारदार शस्त्राने डोक्यात मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न झाला. पाराजी रंगनाथ विरकर हे जखमी झाले आहेत.

त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास मेहरबाबा फाटा, पिंपळगाव माळवी (ता. नगर) शिवारात ही घटना घडली.

या प्रकरणी तिघांविरूध्द जीवे मारण्याचा प्रयत्न कलमान्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी पाराजी यांची पत्नी जया विरकर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपींमध्ये रामदास भोंदे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. मेहरबाबा फाटा, पिंपळगाव माळवी) व दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. फिर्यादी जया व त्यांचे पती पाराजी यांचा रामदास भोंदे याच्यासोबत जुना वाद आहे.

या वादातून रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास रामदास भोंदे व दोन अल्पवयीन मुलांनी पाराजी विरकर यांच्यावर कुर्‍हाड, काठी व लोखंडी धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

पाराजी यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, उपनिरीक्षक चाहेर यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास उपनिरीक्षक चाहेर करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button