अरे बापरे नगर शहरातील ‘या’ भागात चक्क १६ तासाचे भारनियमन; संतप्त ग्रामस्थांनी केले असे काही

नगर तालुक्यातील नेप्ती गावात वाडी-वस्तीवर १६ तासाचे असलेले भारनियमन व पाण्याअभावी पिकांचे होणारे नुकसान, भुरट्या चोर्यां, यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी ग्रामस्थांनी नेप्ती फाटा येथे नगर-कल्याण महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नेप्ती गाव परिसरात विद्युत महावितरणकडून १६ तासाचे भारनियमन सुरु आहे. विहिरीत पाणी असून, विजेअभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने उन्हाळ्याच्या तीव्रतेने पिके करपू लागली आहेत.
तसेच चाऱ्याअभावी जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे परिसरातील नागरिक देखील हैराण झालं आहे.
भारनियमनामुळे परिसरात बत्ती गुल होत असल्याचा फायदा सध्या चोरटे घेत आहे. रात्री अंधाराचा फायदा घेऊन भुरट्या चोर्याचे प्रमाण वाढले असून, यामुळे संपूर्ण ग्रामस्थ त्रस्त झालेे आहेत.
१६ तासाचे भारनियमन कमी करावे, थ्री फेज गेल्यानंतर सिंगल फेज वरील विद्युत पुरवठा कायम ठेवण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.
दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचे निवेदन स्विकारले व भारनियमन कमी करण्याबाबतचे लेखी आश्वासन दिल्याने रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान सदर प्रश्न मार्गी न लावल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण होळकर यांनी दिला.