अहमदनगर

फ्रिज घ्यायला गेले आणि बेदम मार खाऊन आले… या ठिकाणी घडली घटना

तुम्ही माझ्या दारात का आले? असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करत लाकडी दांड्याने जबरदस्त मारहाण करण्यात आल्याची घटना देवळाली प्रवरा परिसरात घडली.

चंद्रकांत संभाजी दोंदे, वय 28 वर्षे, राहणार देवळाली प्रवरा, राहुरी. याने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान फिर्यादीत म्हंटले आहे कि, चंद्रकांत दोंदे व त्याचा भाऊ विकास दोंदे तसेच दोन कामगार प्रसाद सतिश मुसमाडे व सुनिल मिसाळ हे सर्वजण आरोपीला दिलेला फ्रिज आणण्यासाठी सतिश पठारे याच्या घरी गेले होते.

आरोपींनी चंद्रकांत दोंदे याला जातीवाचक शिवीगाळ करुन तुम्ही माझ्या दारात का आले? असे म्हणून त्याने लाकडी दांड्याने विकास दोंदे यास मारहाण करून गंभीर जखमी केले.

त्याचवेळी चंद्रकांत दोंदे हा सोडवा सोडव करण्यासाठी गेला असता त्याला देखील लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केले. त्यावेळी सतिश पठारे याचे आईने चंद्रकांत दोंदे व विकास दोंदे यांना शिवीगाळ करुन मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली.

चंद्रकांत दोंदेंच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी आरोपी सतिश पठारे व त्याची आई दोघे राहणार देवळाली प्रवरा, ता. राहुरी या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button