अहमदनगर

‘क्रिप्टोकंरन्सी’ मध्ये गुंतवणुक करायला गेले अन् 12 लाखांना फसले; कसे…

अहमदनगर- ‘क्रिप्टोकंरन्सी’मध्ये गुंतवणुक करण्याचा बहाणा करून शिर्डी येथे नियुक्तीस असलेले ‘सीआयएसएफ’ कर्मचारी सुमंत कुमार बिमलप्रसाद यादव (वय 37 मुळ रा. ग्राम बरोथा, ता. संभूगंज, जि. बांका, राज्य बिहार, हल्ली रा. सीआयएसएफ क्वॉर्टर, शिर्डी ता. राहाता) यांची एकाने 11 लाख 86 हजार 779 रूपयांची ऑनलाइन फसवणुक केली आहे.

 

16 एप्रिल, 2022 ते 2 ऑगस्ट, 2022 दरम्यान ही घटना घडली असून यासंदर्भात 5 डिसेंबर, 2022 रोजी येथील सायबर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 419, 420 सह आयटी कलम 66 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यादव यांनी फिर्याद दिली आहे.

 

फिर्यादी यांची 16 एप्रिल, 2022 रोजी राजेश सनातनी नामक टेलीग्राम धारक व्यक्तीसोबत ओळख झाली होती. या ओळखीतून राजेश सनातनी याने फिर्यादी यांना ‘क्रिप्टोकंरन्सी’मध्ये गुंतवणुक करण्याचे आमिष दाखविले. फिर्यादी यांचा विश्‍वास संपादन करून 16 एप्रिल ते 2 ऑगस्ट, 2022 दरम्यान वेळोवेळी एकुण 11 लाख 86 हजार 779 रूपये ऑनलाइन घेऊन फसवणुक केली आहे.

 

 

दरम्यान फसवणुक झालेले सुमंत कुमार बिमलप्रसाद यादव यांनी 5 डिसेंंबर, 2022 रोजी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button