अहमदनगर

कुटुंबीय कार्यक्रमासाठी परगावी गेले आणि चोरट्यांनी डाव साधला

 नगर शहरासह जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. अशीच एक घटना नगर शहर परिसरात घडली आहे. शहरातील शिवनगर येथे एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहेत.

या प्रकरणी सुजित उत्तमराव गायकवाड (रा. राजनंदनी हॉटेल मागे, शिवनगर,अहमदनगर) यांनी फिर्याद दिली असून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, गायकवाड हे कुटुंबियांसह दोन दिवसांकरिता नाशिक येथे कार्यक्रमासाठी गेले होते. नाशिकहून परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. घरातील सामानाची उचकापाचक करण्यात आली होती. चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी घरफोडी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सुरु आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात चोरटे खूपच जास्त सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पाळत ठेवून चोरी केल्याच्या घटना देखील उघडकीस आल्या आहेत. दरम्यान चोरट्यांचा सुरु असलेला धुमाकूळ पाहता नागरिक दहशतीखाली वावरू लागला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button