काय सांगता चक्क शेतात सुरु केली गांजाची शेती

Ahmednagar News: शेवगाव तालुक्यातील वाडगव्हाण शिवारात मक्याच्या शेतात लावलेली गांजाची झाडे पोलिसांनी छापा टाकून जप्त केली. या वेळी पोलिसांनी सुमारे २ लाख, ५० हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला.
याप्रकरणी पोलिसांनी अशोक सुदाम काजळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व शेवगाव पोलिसांनी ही ही संयुक्त कारवाई केली. याबाबत सविस्तर माहिती अशी, शेवगाव तालुक्यातील वाडगव्हाण शिवारात अशोक सुदाम काजळे याने गटनंबर ५२/१/१ मधील मक्याच्या शेतात गांजाची झाले लावली असल्याची माहिती अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.
मंगळवार, दि. ९ मे रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या आदेशान्वये शेवगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, सहायक फौजदार विष्णू घोडेचोर,
पोकॉ. किशोर शिरसाट, पोकॉ. शिवाजी ढाकणे, महिला पोना. भाग्यश्री भिटे, चालक पोना. बबन बेरड, गुप्त वार्ता विभागाचे बाप्पासाहेब धाकतोडे, पोर्का. नाकाडे, पोर्का. गर्जे आदींनी शेवगाव तालुक्यातील बाडगव्हाण येथील शेतजमीन गटनंबर ५२/१/१ मध्ये छापा टाकत ही कारवाई केली.
या वेळी पोलिसांनी सुमारे २ लाख ५० हजार ५०० रुपये किमतीची ९५० किलो १०० ग्रॅम वजनाची सुमारे ३३५ लहान, मोठी हिरवी झाडे जप्त केली.
लोढे यांच्या फिर्यादीवरून आरोपी अशोक सुदाम काजळे याच्यावर एन. डी. पी. एस. कायदा सन-१९८५ चे कलम २० (ब) प्रमाणे शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.