कंपनीतील ड्युटी संपल्यानंतर घरी जाताना महिलेसोबत घडलं असं….

अहमदनगर- एमआयडीसीतील कंपनीत काम करणार्या एका महिलेची छेड काढून शिवीगाळ केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी नगर-मनमाड रोडवर घडली. पीडित महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सचिन गर्जे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. मनोरमा कॉलनी, नवनागापूर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी या एमआयडीसीतील कंपनीत काम करतात. मंगळवारी सायंकाळी सुट्टी झाल्यानंतर त्या नगर-मनमाड रोडवरून घरी जात असताना बिर्याणी हाऊसच्यासमोर सचिन गर्जेने त्यांना दुचाकी आडवी लावली.
त्याने फिर्यादीचा हात पकडला व म्हणाला,‘मला तुझा नंबर दे, तु कुठल्या कंपनीत कामाला जाते त्या कंपनीचे नाव सांग,’ फिर्यादीने त्याला नकार दिला असता,‘माझा नंंबर घे व बोलुन झाल्यावर तो डिलीट कर, असे म्हणून तो तेथून निघून गेला. घडलेला प्रकार फिर्यादीने सचिन गर्जेच्या वडिलांना सांगितला असता त्यांनी मला धक्का देवून शिवीगाळ केले. तसेच सचिन गर्जे याने सुध्दा शिवीगाळ केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार लोखंडे करीत आहेत.