अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी चाललय तरी काय ? आठवड्याभरात पाच अल्पवयीन मुली…

राहुरी तालूक्यातून काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींचे अपहरण होण्याच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण होण्याची ही पाचवी घटना आहे.

राहुरी तालूक्यातील राहुरी खुर्द परिसरातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अपहरण करून पळवून नेले. या घटनेतील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही राहुरी तालूक्यातील राहुरी खुर्द परिसरात तिच्या आई वडिलां सोबत राहते.

दिनांक २८ मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजे दरम्यान ती अल्पवयीन मुलगी पेपरला जाते असे सांगून घरातून बाहेर गेली होती.

ती सायंकाळी उशिरा पर्यंत घरी परत आली नाही. तिच्या नातेवाईकांनी तिचा खूप शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही.

आपल्या मुलीचे कोणीतरी अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याची खात्री झाल्यानंतर अखेर त्यांनी राहुरी पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला.

त्या अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून पोलिसांत अज्ञात इसमा विरोधात त्याच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एकनाथ आव्हाड हे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button