ताज्या बातम्या

जमीन बक्षीसपत्र म्हणजे काय, ते कसे करायचे ?

यासंदर्भात नियम साधे सोपे आहेत. यासाठी दुय्यम निबंधकांकडून माहिती मिळू शकते. बक्षीसपत्रांपेक्षा वाटणीपत्र करून देण्यावर अधिक भर असल्याचे दिसून येते. मात्र, या प्रक्रिया दररोज घडत नाहीत. वाटणीपत्रांचे व्यवहार मात्र जास्त प्रमाणात होतात.

पत्नी, मुलगा, मुलगी व नातू या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीला जमीन हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला जमीन बक्षीसपत्र म्हटले जाते. कायदेशीर बक्षीसपत्रामुळे भविष्यात कौटुंबिक वाद उद्भवत नाहीत.

यासंदर्भात नियम साधे सोपे आहेत. यासाठी दुय्यम निबंधकांकडून माहिती मिळू शकते. बक्षीसपत्रांपेक्षा वाटणीपत्र करून देण्यावर अधिक भर असल्याचे दिसून येते. मात्र, या प्रक्रिया दररोज घडत नाहीत. वाटणीपत्रांचे व्यवहार मात्र जास्त प्रमाणात होतात.

जमीन बक्षीसपत्र म्हणजे काय ?

Advertisement

• पत्नी, मुलगा, मुलगी अथवा नातवाच्या नावाने जमीन हस्तांतरित करणे म्हणजे जमीन बक्षीसपत्र, वाटणीपत्रात मुलांच्या नावाने वाटणी केली जाते.

मुद्रांक शुल्क किती ?

जमीन व प्लॉट नजीकच्या नातेवाइकाच्या नावावर बक्षीसपत्र करून दिल्यास फक्त एक टक्का मुद्रांक शुल्क | लागते. पाच टक्के मुद्रांक शुल्क माफ होते, बहीण, भावाचे बक्षीसपत्र असेल तर ४ टक्के शुल्क भरावा लागतो.

Advertisement

बक्षीसपत्रावर दोन साक्षीदारांच्या सह्या आवश्यक

बक्षीसपत्रावर दोन साक्षीदारांच्या सह्या आवश्यक आहेत. हे साक्षीदार बक्षीसपत्र ज्यांच्या नावावर करून दिले जाणार आहे, त्यांना ओळखणारे ते कुणीही असले तरी व्यवहार होतो

रजिस्ट्री करताना ही काळजी घ्या

Advertisement

■ जमिनीचे सातबारे पाहिले जातात. म्हणून ते सोबत ठेवणे आवश्यक आहेत. प्लॉटसाठी सातबारा, एनए ४४, बांधकाम परवानगी व पूर्णत्वाचा दाखला पाहिला जातो

Related Articles

Leave a Reply

Back to top button