बाजारभाव

कांदा, डाळिंबाला किती मिळतोय बाजार भाव

अहमदनगर- राहाता बाजार समितीत रविवारी कांद्याच्या 15234 गोण्यांची आवक झाली. जास्तीत जास्त 1600 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 1 ला 1300 ते 1600 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 750 ते 1250 रुपये भाव मिळाला.

 

कांदा नंबर 3 ला 300 ते 700 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 700 ते 900 रूपये, तर जोड कांदा 100 ते 300 रुपये भाव मिळाला.

 

डाळिंबाच्या 5283 कॅरेटची आवक झाली. डाळींब नंबर एक ला प्रतिकिलोला 131 ते 195 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 91 ते 130 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 46 ते 90 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 4 ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button