बाजारभाव

कांदा, सोयाबीन, डाळींबाला किती मिळतोय बाजार भाव

अहमदनगर- राहाता बाजार समितीत मंगळवारी सोयाबीनला 5179 रुपये भाव मिळाला, तर कांद्याला 1600 रुपये भाव मिळाला.

 

कांद्याच्या 18764 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला कमीत कमी 1200 तर जास्तीत जास्त 1600 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 750 ते 1150 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 300 ते 700 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 550 ते 850 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 200 रुपये भाव मिळाला.

 

सोयाबीनला कमीत कमी 4643 रुपये, जास्तीत जास्त 5179 रुपये, तर सरासरी 5050 रुपये. गव्हाला सरासरी 2660 रुपये. मकाला सरासरी 2586 रुपये भाव मिळाला. बाजरीला कमीत कमी 2420 रुपये, जास्तीत जास्त 2467 रुपये तर सरसरी 2450 रुपये भाव मिळाला.

 

डाळिंबाच्या 9181 क्रेट्स ची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 126 ते 220 रुपये, डाळिंब नंबर 2 ला 81 ते 125 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 41 ते 80 रुपये, डाळिंब नंबर 4 ला 10 ते 40 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button