आरोग्य

वंध्यत्व समस्या म्हणजे काय ? पुरुष वंध्यत्वाविषयीचे गैरसमज आणि लक्षणे आणि उपचार ! वाचा सविस्तर माहिती

पुरुष वंध्यत्वाबद्दलची महत्वपूर्ण माहिती इथे देण्यात आली आहे.

पुरुष वंध्यत्वाविषयीचे गैरसमज वंध्यत्वाबद्दल अनेक गैरसमज आहेत. भारतीय सामाजिक नियमांमध्ये प्रजननतेला महत्वाचे स्थान असून, यांद्वारे मुलं जन्माला घालण्यासाठी भर दिला जातो, आणि अखेरीस गर्भधारणेच्या अक्षमतेसाठी समाज नेहमी स्त्रियांनाच दोष देतो.

खरंतर, डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, सामान्य लोकसंख्येमध्ये वंध्यत्वाची व्यापकता १५ ते २० टक्के असून, पुरुष वंधत्वघटकाचा यांमध्ये २० ते ४० टक्के योगदान आहे.

सर्वात महत्वाची गोष्ट अशी की, गेल्या काही वर्षांपासून भारतातील पुरुष वंध्यत्व दर वाढत असून, अभ्यासकांद्वारे हा दर जवळपास २३ टक्के इतका आहे.

वंध्यत्व म्हणजे काय ? वंध्यत्व प्रजनन संदर्भातील समस्या असून, १२ महिने किंवा त्याहून अधिक काळ सामान्य स्वरूपातील असुरक्षित यौन संबंध ठेवल्यानंतर ही नैदानिक गर्भधारणा अयशस्वी होण्यास ही समस्या कारणीभूत असते – इंटरनॅशनल कमिटी फॉर मॉनिटरिंगअसिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)

पुरुष वंध्यत्व पुरुष वंध्यत्वाची अनेक कारणे आहेत. जसे की, शुक्राणूंची कमतरता, शुक्राणुचे कमी उत्पादन, शुक्राणूंचे असामान्य कार्य पासून ते शुक्राणूंच्या वितरणास प्रतिबंध घालणारे घटक किंवा त्या मार्गात येणाऱ्या समस्या इत्यादी.

अश्या विविध समस्या जननेंद्रियांच्या मार्गातील जखमांमुळे किंवा संसर्गामुळे होऊ शकतात. तसेच अन्य बाह्य घटक देखील वंध्यत्वास कारणीभूत ठरू शकतात : जसे की, धूम्रपान, अति मद्यपान, खराब आहार, कमी व्यायाम, जाडपणा, तणाव तसेच काही रसायनांच्या किंवा कीटकनाशकाच्या संपर्कामध्ये आल्यास.

जुने आजार, दुखापती, दीर्घकालीन आरोग्य समस्या आणि बदलती जीवनशैली पुरुष वंध्यत्व समस्येला योगदान करू शकतात.

लक्षण जेव्हा लक्षण दिसून येतात तेव्हा, भारतीय सामाजिक मानसिकतेमुळे योग्य वेळेत मदत मिळण्यास उशीर होतो- काही प्रकरणामध्ये असे दिसून येते की पुरुष गैरसमझुतीमुळे किंवा समाजात लाज जाईल या भीतीने स्वतःचे प्रजनन परीक्षण करून घेण्यास संकोच करतात.

आपल्या प्रजनन स्वास्थ्याबद्दल पुरुष आणि स्त्रियांनी समान स्वरूपात जागृत राहणे गरजेचे आहे. पुरुषांनी लैंगिक कार्यातील समस्यांसाठी उपचार घेण्यास टाळाटाळ करू नये.

वीर्य स्खलन होण्यात अडचण किंवा लहान प्रमाणात द्रवपदार्थ बाहेर पडणे, लैंगिक इच्छा कमी होणे किंवा इरेक्शन (इरेक्टाइल डिसफंक्शन) राखण्यात अडचण या सर्व गोष्टी पुरुष वंध्यत्वास कारणीभूत ठरू शकतात.

याव्यतिरिक्त, अंडकोषाच्या भागात वेदना, सूज किंवा ढेकूळ यासारख्या विकृतींकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.

पुरुष वंध्यत्वाचे निदान कसे करावे? सकारात्मक बाब म्हणजे, तुम्ही जितक्या लवकर विशेषज्ञकडे जाल तितक्या लवकर तुम्ही निदान प्राप्त करून, समस्येचे निवारण करू शकतात. तुमची संपूर्ण मेडिकल हिस्ट्री, शारीरिक तपासणी, रक्त चाचण्या, सामान्य हार्मोन्स टेस्ट आणि वीर्य विश्लेषणाचे निदान यांत करण्यात येते.

वीर्य विश्लेषणामध्ये (शुक्राणू चांगल्या प्रकारे कार्य करत आहेत की नाही, आणि ते गतिमान आहेत कि नाही) शुक्राणूंची निर्मिती आणि शुक्राणूंच्या गतीची पातळी पाहिली जाते.

जरी या विश्लेषणात, शुक्राणूंची संख्या कमी किंवा शुक्राणू विरहित वीर्य यांसारखे परिणाम दिसून आले तरीही, उपचाराचे विविध पर्याय उपलब्ध आहेत.

यासंदर्भात, ट्रान्सरेक्टल अल्ट्रासाऊंड, टेस्टिक्युलर बायोप्सी (वंध्यत्वाचे कारण संपवून सहाय्यक पुनरुत्पादन तंत्रात वापरण्यासाठी शुक्राणू गोळा करणे), हार्मोनल प्रोफाइल, वीर्यपतनानंतरचे मूत्र विश्लेषण ( ज्यात शुक्राणू मूत्राशयात मागे जात आहेत की नाही याचे निदान करण्यासाठी) यांसाख्या पुढील चाचण्या करण्याचा सल्ला देण्यात येतो.

पुरुष वंध्यत्वाचे निदान करण्यात सहाय्य करणाऱ्या प्रगत तंत्रज्ञानापैकी एक म्हणजे शुक्राणूंची डीएनए विखंडन चाचणी. ही चाचणी शुक्राणूंच्या आनुवंशिक घटकांच्या कोणत्याही समस्यांचे आकलन करण्यासाठी केली जाते, कारण यांद्वारे शुक्राणूमध्ये डीएनएचे कोणतेही नुकसान झालेले नाही ना हे शोधून काढता येते.

तसेच, पुरुष वंध्यत्वाचे कारण शोधण्यासाठी अनुवांशिक पार्श्वभूमीचा अभ्यास करण्यासाठी सहायक ठरणारे स्पर्म ऐनुप्लोइडी टेस्ट (SAT) देखील केली जाते. ज्याद्वारे, शुक्राणूंच्या नमुन्यातील गुणसूत्रातील असामान्यता दिसून येते.

उपचार सर्वप्रथम आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे, डॉक्टर वंध्यत्वाला कारणीभूत ठरणारे बाह्यघटक जसे की, धूम्रपान, अतिमद्यपान सोडून देणे तसेच मधुमेह, लठ्ठपणाला कारणीभूत ठरणाऱ्या जीवनशैलीचा त्याग करण्याचा सल्ला देतात.

सर्वप्रथम आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे, डॉक्टर वंध्यत्वाला कारणीभूत ठरणारे बाह्यघटक जसे की, धूम्रपान, अतिमद्यपान सोडून देण्याचा आणि मधुमेह, लठ्ठपणा नियंत्रित करणारी जीवनशैली आत्मसात करण्याचा सल्ला देतात.

त्यानंतर, प्रजनन मार्गामधील विविध संसर्गाच्या संबंधित, एंटीबायोटिक उपचारांचा सल्ला दिला जातो. लैंगिक संभोगाच्या समस्यांवर औषधोपचार किंवा समुपदेशनाच्या स्वरूपात उपचार केले जातात, हे इरेक्टाइल डिसफंक्शन किंवा अकाली वीर्यपतन सारख्या परिस्थितीत प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत करू शकतात.

अंडकोशातील अडथळ्यामुळे एज़ोस्पर्मिया (शून्य शुक्राणु संख्या), ओलिगोस्पर्मिया (शुक्राणूंची मर्यादित उत्पत्ती) सारख्या समस्याचे निवारण केले जाऊ शकते. हि एक अशी प्रक्रिया आहे, ज्यात डॉक्टर अंडकोषातून शुक्राणू काढू शकतात.

सहाय्यक पुनरुत्पादन तंत्र (ART) मधील विविध प्रगती जगभरातील वंध्यत्वाचा सामना करणाऱ्या हजारो जोडप्यांना वरदान ठरल्या आहेत.

पुरुष वंध्यत्वाच्या उपचारांसाठी सहाय्यक पुनरुत्पादनाच्या सर्वात लोकप्रिय तंत्रांपैकी इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन (IUI), इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) आणि इंट्रासाइटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन (ICSI) आहेत. उपचारामध्ये सामान्य स्खलन, क्रियेद्वारे किंवा दाता व्यक्तींकडून शुक्राणू मिळवले जाते.

आईवीएफ (IVF) मध्ये, अंडाशयातून अंडी मिळवली जाते और प्रयोगशाळेत शुक्राणूंद्वारे फलित होते आणि फलित अंडी (भ्रूण) पुन्हा स्त्रीच्या गर्भाशयात टाकली जाते. IUI मध्ये एक विशेष ट्यूब चा वापर करून शुक्राणूंना महिलेच्या गर्भाशयात ठेवले जाते.

या पद्धतीचा वापर तेव्हाच केला जातो जेव्हा पुरुष जोडीदाराच्या शुक्राणूंची संख्या खूप कमी असते, किंवा शुक्राणूंचा वेग कमी किंवा प्रतिगामी स्खलन होत असल्यास. (ICSI)आईसीएसआई एक अशी प्रक्रिया आहे

ज्यामध्ये शुक्राणू आणि अंडी दोन्ही ही संबंधित जोडीदारांकडून प्राप्त केली जातात, आणि त्यानंतर एकच शुक्राणू अंड्यामध्ये इंजेक्ट केला जातो. त्यानंतर फलित झालेले अंड महिलेच्या गर्भाशयामध्ये प्रत्यारोपित करण्यात येते.

पुरुष वंध्यत्व सारख्या समस्येचा सामना करणाऱ्या जोडप्यांना मदतीचा हाथ म्हणून माइक्रो-टीईएसई, आईएमएसआई आणि स्पर्म वीडी क्रायोप्रेजर्वेशन डिवाइस सारखे प्रगत तंत्रज्ञान देखील आता उपलब्ध झाले आहेत

Related Articles

Leave a Reply

Back to top button