अहमदनगर

‘भंडारदरा’ आणि ‘मुळा’ धरण किती टक्के भरले

अहमदनगर – चार दिवसांच्या तुलनेत पाणलोटातील पावसाचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले असलेतरी आवक होत असल्ययाने भंडारदरा धरणातील पाणीसाठा रात्री उशीरा 55 टक्क्यांवर गेला आहे. निळवंडे 60 टक्के भरले आहे. 8330 दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा काल रात्री आठ वाजता 5009 दलघफू झाला होता.

पावसाची जोरदार बॅटींग सुरू असल्याने काल सकाळी संपलेल्या 24 तासांत भंडारदरात 336, निळवंडेत 299 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठा वाढत आहे. आठ दिवसांत भंडारदरात 3686 दलघफू नवीन पाणी आले. काल बुधवारी दिवसभरात भंडारदरात 57 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, पाणलोटात पाऊस सुरू असल्याने नवीन पाण्याची आवक सुरू असून अकोले, संगमनेर आणि सिन्नर तालुक्यातील सोळा गावांचे भवितव्य अवलंबून असणारे आढळा धरणही ओव्हरफ्लोच्या मार्गावर आहे. 1060 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल बुधवारी सकाळी पाणीसाठा 820 दलघफू होता. त्यात आणखी वाढ होत तो सायंकाळी 861 दलघफू (81.23 टक्के) झाला होता. पावसाचा जोर टिकून राहिल्यास हेही धरण आज-उद्या ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.

काल दुपारनंतर पाणलोटात पुन्हा पावसाने जोर धरल्याने नगर जिल्ह्यातील सर्वाधिक साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणातील पाणीसाठा आज-उद्या निम्म्यावर जाण्याची शक्यता आहे. मुळा नदीचा विसर्ग मंगळवार सायंकाळी केवळ 5638 क्युसेक होता. तो काल बुधवारी सायकाळी 8028 क्युसेक होता. संततधार सुरू असल्याने त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 26000 दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा 11623(44.70 टक्के) होता. त्यात आज पुन्हा चांगली वाढ होणार आहे. बलठण तलावही ओव्हरफ्लो झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button