आरोग्यताज्या बातम्या

नवजात बालकाला कावीळ झाली तर काय काळजी घ्याल ?

वाढल्यास काविळीचा धोका वाढतो. त्यामुळे बालकांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

Health News : नवजात बालकाला कावीळ होऊ शकते. जन्मानंतर तांबड्या पेशी कमी होतात व जन्मानंतर तीन-चार दिवसांत बिलीरुबीन वाढते.

ते वाढल्यास काविळीचा धोका वाढतो. त्यामुळे बालकांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

नवजात बालकाला कावीळ होण्याची कारणे ?

Advertisement

बाळ व आईच्या रक्तगटात समस्या असल्यास, रक्तगट आरएच व एबीओ असल्यास. प्री मॅच्युअर बाळ, दूध कमी पाजणे, ब्रेस्ट मिल्क जॉन्डीस, इन्फेक्शन, काही जेनेटिक आजार, थायरॉइड आदी कारणे आहेत.

काही वेळेला नवजात बाळाचा ब्लड ग्रुप वेगळा असला तर पहिल्या बाळाला काही नाही; पण दुसऱ्या बाळाला कावीळ होण्याची शक्यता जास्त असते. बिलीरुबीन मेंदूपर्यंत गेल्यास त्याचा मुलांच्या वाढीवर दुष्परिणाम होतो. बिलीरुबीन हे जन्मतः वाढले तर दुसरे नवीन रक्त देतात.

लक्षणे काय ?

Advertisement

पाच मिली ग्रॅम कावीळ असेल तर बाळ पिवळे दिसते. डोळे पिवळे दिसतात. नैसर्गिक कावीळ नुकसानकारक नसते, जास्त कावीळ वाढल्यास झटके कमी होऊ शकतात. सूर्यप्रकाशात बाळाचे परीक्षण केले असता कपाळ, छाती, पोट, तळहात, तळपाय पिवळे दिसतात. तळहात व तळपाय पिवळे दिसल्यास त्वरित कावीळसाठी रक्ततपासणी करावी

काय काळजी घ्याल?

बालरोगतज्ज्ञांना दाखवणे गरजेचे आहे. कावीळची रक्ताची तपासणी करावी. बाळ जन्मल्यावर लगेचच आईचे दूध पाजावे. वेळोवेळी सूर्यप्रकाशात बाळाला नेऊन त्यास कोवळे ऊन द्यावे. बाळाचा रक्तगट व थायरॉइडची तपासणी करावी. आईचा रक्तगट निगेटिव्ह असल्यास लगेचच डॉक्टर्सच्या निदर्शनास आणून द्यावे.

Advertisement

कावीळ हा आजार नवजात शिशूमध्ये आढळणारी एक महत्त्वाची समस्या आहे. बिलीरुबीन हा घटक नवजात शिशुमध्ये मेंदूवर दुष्परिणाम करू शकतो म्हणून या कावीळकडे गंभीरतेने बघितले पाहिजे. नवजात शिशुमध्ये ५ ते १० टक्के जणांना जास्त प्रमाणात कावीळ होते, ज्यास उपचारांची गरज भासते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button