ताज्या बातम्या

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस पडला नाही तर काय होईल ? चिंता व्यक्त

Advertisement

Maharashtra Rain : राज्यात आतापर्यंत अनेक भागांत अपेक्षित पाऊस झालेला नाही. आता तर त्याने दडीच मारली आहे. अशा स्थितीत येत्या काळातही अपेक्षित पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या वैरणीचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्याचे नियोजन करा,

त्याच बरोबर येत्या रब्बी हंगामासाठी संबंधित विभागांनी तयारी करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी शुक्रवारी दिल्या.

राज्यात यावर्षी सरासरीच्या केवळ ८९ टक्केच पाऊस झाला आहे. त्यात १ ऑगस्टपासून पावसाने दडी मारल्याने राज्यातील खरीप हंगाम वाया जाण्याच्या मार्गावर आहे.

Advertisement

याबाबत शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच राज्यातील कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर २२ ऑगस्ट रोजी कृषी विभाग व्यापक बैठक घेणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

यंदा मान्सूनचे आगमन उशिरा होऊन पेरण्या लांबल्या. अनेक भागांत पाऊस पडलाच नाही तर काही भागात त्याने मोठी ओढ दिली. जुलैमध्ये पाऊस झाला असला तरी कमी कालावधीत जास्त पाऊस झाला असून त्याचा फारसा फायदा पिकांना झालेला नाही.

आता पावसाअभावी पिकांनी माना टाकल्या आहेत. दुबार पेरणीची वेळही निघून गेली आहे. राज्यात कापूस, मका, सोयाबीन, तूर, ज्वारी, भुईमूग आणि कापूस पेरण्या उरकल्या असून भात व नाचणीची लावणी पूर्ण झाली आहे.

Advertisement

या पिकांचे फुटवे फुटण्याचा कालावधी आहे. सोयाबीन, भुईमूग फुलोऱ्यावर असला तरी त्याला आता पावसाची नितांत गरज आहे. उशिराच्या पावसामुळे उडीद, मूग आदी पिकांचे पेरणी क्षेत्र घटल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी दिली.

तसेच गतवर्षी सरासरी १२२.८ टक्के पाऊस झाला होता, तर यंदा सरासरीच्या केवळ ८९ टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील केवळ ६ जिल्ह्यांतच १०० टक्के पाऊस झाला असून १३ जिल्ह्यात ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. १५ जिल्ह्यांत ५० ते ७५ टक्के पाऊस,

तर राज्यातील १३ तालुक्यांत २५ ते ५० टक्के पाऊस झाला आहे. पिकांबरोबराच अनेक भागांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि जनावरांच्या चाऱ्याचे संकट वाढते आहे.

Advertisement

यावर मंत्रिमंडळ बैठकीत चिंताही व्यक्त करण्यात आली. याअनुषंगाने कृषी तसेच महसूल व संबंधित विभागांनी चारा, वैरण, पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन तयार ठेवावे, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी दिल्या.

पिण्याच्या पाण्यासाठी ३५१ टँकर्स सुरू

राज्यातील मोठे, मध्यम व लघुपाटबंधारे प्रकल्पात ६१.९० टक्के पाणीसाठा असून गेल्या वर्षी याच सुमारास ८०.९० टक्के पाणीसाठा होता. नागपूर विभागातील धरणांमध्ये सध्या ७०.४७ टक्के, अमरावती ६६.५७ टक्के, औरंगाबाद ३१.६५ टक्के,

Advertisement

नाशिक ५७.१६ टक्के, पुणे ६८.२३ टक्के आणि कोकण ८७.२५ टक्के अशी पाणी साठ्याची स्थिती आहे. सध्या राज्यात ३२९ गावे आणि १२७३ वाड्यांमध्ये ३५१ टँकर्स सुरू आहेत, अशी माहिती मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button