
महाराष्ट्रातील बहुचर्चित कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांना बेताल वक्तव्य करणं भोवलं आहे. इंदोरीकर महाराजांनी किर्तनातून लिंगभेदावर भाष्य केलं होतं. सम आणि विषम तारखेला शरीर संबंध ठेवल्यास मुलगा आणि मुलगी होत असल्याचं इंदोरीकर महाराज म्हणाले होते. त्यांच्या या विधानावरून एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मुलन समितीने औरंगाबाद न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी झाली. अखेर कोर्टाने इंदोरीकर महाराज यांच्याबाबत मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे इंदोरीकर महाराज यांच्या अडचणी वाढणार आहेत
काही दिवसांपूर्वी इंदोरीकर महाराज यांनी लिंगभेदाबाबत वक्तव्य केलं होतं. सम आणि विषम तारखेला स्त्री-पुरूष संबंध आले तर, यामुळे मुलगा किंवा मुलीचा जन्म कसा होतो, अशा आशयाचं वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी केले होते. यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण सत्र न्यायालयात सुरू होतं. सत्र न्यायालयात इंदुरीकर महाराज यांच्या विरूद्धचा गुन्हा रद्द करण्यात आला होता.
इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, असे आदेश औरंगाबाद कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होणार असून इंदोरीकर महाराज यांच्या अडचणीत चांगली वाढ झाली आहे. इंदोरीकर महाराज यांनी लिंगभेदाबाबत विधान केल्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समितीने त्यांच्या विरोधात कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल केली होती. कनिष्ठ न्यायालयाने इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. हा गुन्हा रद्द करावा म्हणून इंदोरीकर महाराज यांनी सेशन कोर्टात याचिका दाखल केली होती. सेशन कोर्टाने त्यांच्यावरील गुन्हा रद्द केला होता. त्यानंतर हे प्रकरण औरंगाबाद खंडपीठात गेलं. त्यावर सुनावणी झाली असता कोर्टाने इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
इंदोरीकर महाराज हे मिश्किल, विनोदी आणि उपरोधिक शैलीत कीर्तन करण्यात प्रसिद्ध आहे. शिर्डीत त्यांचं कीर्तन सुरू असताना त्यांनी लिंगभेदावर भाष्य केलं होतं. सम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगा होतो, तर विषम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगी होतो, असं वादग्रस्त वक्तव्य महाराज इंदुरीकर यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांना पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितलं होतं. त्यानंतर इंदोरीकर महाराज यांनी स्पष्टीकरणही दिलं होतं.
व्हिडीओत काय?
इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यात ते लिंगभेदावर भाष्य करताना दिसत होते. “स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते, असं त्यांनी म्हटलं होतं.
इंदुरीकर महाराज कोण आहेत?
निवृत्ती देशमुख म्हणजेच इंदुरीकर महाराज हे नाव आता घरोघरी ओळखीचं झालं आहे. खेडोपाड्यात कीर्तनं करून हसत हसत लोकांना चार आध्यात्मिक गोष्टी सांगणारे इंदुरीकर महाराज युट्यूबमुळे शहरांमध्येही पोहोचले आहेत. निवृत्ती देशमुख यांचा 9 जानेवारी 2019ला 48वा अभीष्टचिंतन सोहळा पार पडला. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचं गाव. या गावाच्या नावावरूनच त्यांना पुढे चालून इंदोरीकर या नावानं ओळखलं जाऊ लागलं. पुढे ‘इंदोरीकर’चा अपभ्रंश ‘इंदुरीकर’ असा झाला आणि आता ते इंदुरीकर याच नावाने ओळखले जातात. राज्यभरातल्या राजकीय नेत्यांच्या अभीष्टचिंतनानिमित्त इंदुरीकरांच्या कीर्तनाचं आयोजन केलं जातं. इंदुरीकरांच्या कीर्तनाची लोकप्रियता इतकी आही की त्यांची तारीख मिळण्यासाठी लोक वर्षानुवर्षं वाट पाहतात.