अहमदनगर

WhatsApp Tips :- आता ५ नाही तर एकाच वेळी २५० जणांना पाठवता येईल WhatsApp मेसेज फक्त कराव लागेल हे काम…

WhatsApp Tips : Now you can send WhatsApp messages to 250 people at a time.

WhatsApp हे आजच्या युगात संवाद साधण्यासाठी लोकांचे आवडते अॅप बनले आहे. असे अनेक अॅप्स आहेत जे ऑनलाइन चॅटिंगसाठी वापरले जातात.

व्हॉट्सअॅपचा वापर फक्त बोलण्यासाठी केला जात नाही, आता तुम्ही व्हॉट्सअॅपवर पेमेंट देखील करू शकता. व्हिडीओ कॉल, फोटो पाठवणे, गाणी पाठवणे, ग्रुप कॉल असे अनेक फायदे आहेत जे आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडतात.

व्हॉट्सअॅपवर अनेक सुविधा असल्या तरी तुम्हाला एकाच वेळी अनेकांना व्हिडिओ, फोटो किंवा काहीही पाठवायचे असेल तर ते मात्र अवघड आहे.

तुम्ही एकाच वेळी फक्त पाच लोकांना अटॅचमेंट किंवा मेसेज पाठवू शकता, जर तुम्हाला त्याच गोष्टी पुन्हा कुणाला पाठवायच्या असतील तर पुन्हा-पुन्हा Contacts निवडावे लागतात.

जर तुम्हीही अशा समस्येने त्रस्त असाल तर जाणून घ्या व्हॉट्सअॅपच्या या खास ट्रिकबद्दल.एकाच वेळी अनेकांना मेसेज कसा पाठवायचा?

सर्वप्रथम तुमचा स्मार्टफोन घ्या. त्यानंतर तुमचे WhatsApp ओपन करा. आता तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर पहा, तीन डॉट्स दिसतील. त्या तीन डॉट्स च्या पर्यायावर क्लिक करा.

आता New Group, New Broadcast, Linked Device, Starred Message, Payment आणि Settings चा पर्याय दिसेल. यानंतर New Broadcast च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह केलेले सर्व नंबर स्क्रीनवर दिसतील. आता ज्या व्यक्तीला काहीही पाठवायचे आहे त्याच्या नावावर क्लिक करा.

यामध्ये तुम्ही २४० लोकांपर्यंतचे नंबर निवडू शकता. त्यानंतर उजवीकडे एक चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करा. असे केल्यानंतर २५० जणांचा ग्रुप तयार होईल. या ग्रुपमध्ये कोणताही व्हिडिओ, फोटो आणि मेसेज एकत्र पाठवता येईल.

Web Tital : WhatsApp Tips Now you can send WhatsApp messages to 250 people at a time.

Related Articles

Leave a Reply

Back to top button