अहमदनगर

व्हाट्सअ‍ॅपला वादग्रस्त स्टेटस ठेवणे भोवले; पोलिसांनी युवकावर केली ‘ही’ कारवाई

एका युवकाला व्हाट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवणे चांगलेच महागात पडले आहे. या स्टेटसमधून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असा संदेश प्रसारित झाल्याने पोलिसांनी त्या युवकाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि कलम 505 (2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

अनिकेत चंद्रकांत ढाणके (वय 20 रा. प्रशांत सोसायटी, शिवाजीनगर, कल्याण रस्ता, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलीस शिपाई उमेश दगडू शेरकर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी समाजात तेढ निर्माण होईल, अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करणार्‍यांविरूध्द कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी सोशल मीडियावर पोलिसांची नजर आहे.

कोतवाली गोपनीय शाखेचे सहायक फौजदार राजेंद्र गर्गे, पोलीस नाईक सिताराम खामकर, पोलीस शिपाई शेरकर हे सोशल मीडियावरील व्हाट्सअ‍ॅप ग्रुपची तपासणी करत असताना

अनिकेत ढाणके याने त्याच्या व्हाट्सअ‍ॅप स्टेटसला दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन व्देषाची भावना तयार होईल व सामाजिक शांतता भंग होईल, असा व्हिडिओ ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यानंतर शेरकर यांच्या फिर्यादीवरून ढाणकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button