नागवडेंच्या ६ कंपन्या कोठून आल्या ते सांगावे : विरोधकांचे आव्हान

श्रीगोंदा तालुक्यातील नागवडे कारखान्याची निवडणूक लागली आहे. त्यामुळे तालुक्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
गेली ११ वर्षापासून डीसलरी बंद असल्याने वर्षाला ९ कोटीचा तोटा होत असल्याने सभासदांच्या उसाला बाजारभाव मिळत नाही.
स्व.बापू हयात असताना कारखान्यावर कर्जाचा डोंगर नव्हता, मात्र बापूंच्या नंतर मात्र कारखान्यावर ३५० कोटींचे कर्ज झाले.
८ लाख रूपये उत्पन्न असताना त्यांनी खासगी कंपन्या कशा उभ्या केल्या ते सांगावे.असे आव्हान कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव मगर यांनी दिले.
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते म्हणाले की स्व. बापू नंतर सहकारात मुलगा राजेंद्र नागवडे यांनी बेबनाव सुरू करून सामान्य शेतकरी सभासदांची कामधेनू अडचणीत आणली.
आम्ही देखील सहकारी संस्था चागल्या आदर्श पद्धतीने चालवितो मात्र आम्ही त्यातून आमच्या खाजगी मालमत्ता नाही उभ्या केल्या नसल्याचे सांगत नागवडे यांच्यावर जोरदार टीका केली.