Ahmednagar News : वांबोरी चारीचे पाणी गेले कुठे ? पाण्यात राजकारण आणू नका याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील…
तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरलेल्या वांबोरी चारी योजनेची कळ दाबून तब्बल २५ दिवस होत आले तरीही पाणी अद्याप या गर्भगिरी डोंगराच्या दुष्काळी भागातील तलावात का पोहचले नाही, असा प्रश्न या भागातील कार्यकर्ते, शेतकरी विचारू लागले आहेत.

पावसाळा संपत आला तरी पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागात अद्यापही पाऊस नाही. त्यामुळे दुष्काळाचे संकट या भागातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसमोर उभे ठाकले आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरलेल्या वांबोरी चारी योजनेची कळ दाबून तब्बल २५ दिवस होत आले तरीही पाणी अद्याप या गर्भगिरी डोंगराच्या दुष्काळी भागातील तलावात का पोहचले नाही, असा प्रश्न या भागातील कार्यकर्ते, शेतकरी विचारू लागले आहेत.
पाथर्डी तालुक्याच्या दुष्काळी भागाला वरदान ठरलेल्या वांबोरी चारीची कळ दाबून महिना होत आला आहे. मात्र वांबोरी चारीचे पाणी अद्यापही या गर्भगिरी डोंगररांगांच्या दुष्काळी पट्ट्यात का पोहचले नाही? वांबोरी चारीचे पाणी गेले कोठे, असा सवाल या भागातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
मिरी परिसरातील शिंगवे केशव, शंकरवाडी, मिरी तर करंजी परिसरातील करंजी, कौडगाव, खांडगाव, सातवड, भोसे, लोहसर गितेवाडीसह अनेक गावात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दुष्काळी भागातील जनतेच्या भावनेशी खेळू नका. पाण्यात राजकारण आणू नका याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा या भागातील माजी पंचायत समितीचे सदस्य राहुल गवळी,
राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजू शेख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष अंबादास डमाळे, राजेंद्र म्हस्के, मंगलताई म्हस्के, संभाजीराव दारकुंडे, जालिंदर गवळी,
आदिनाथ सोलाट, संभाजी झाडे, विजय गुंड, शिंगवे येथील अंबादास बोंगाणे, सरपंच बलभीम ससे, किरण शेलार, प्रताप घोरपडे, विजय पालवे, पिनू मुळे, भानुदास आव्हाड, संतोष गरुड, राजेंद्र गिते, भाऊसाहेब पोटे, गर्भगिरी डोंगर पट्ट्यातील सर्व सरपंच, नागरिकांनी दिला आहे.
वांबोरी चारीचे पाणी नेमके कोठे मुरते याची पाहणी काही नागरिकांनी केली. वांबोरी चारीचे पाणी वांबोरी गावच्या नदीत चालल्याचे दिसून आले. याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे दिसून आले. त्यामुळे तहानलेल्या दुष्काळी भागाला पाण्यापासून वंचित रहावे लागले आहे.