अहमदनगरताज्या बातम्या

देवदर्शनाला गेल्या आणि येतांना वाटेतच चोरट्यांनी गाठले अन पुढे नको तेच झालं

धूम स्टाईलने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने चोरुन नेल्याच्या दोन घटना नगर शहरात घडल्या असून रविवारी (दि.९) रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास माळीवाडा ते मार्केटयार्ड रोडवर पहिली घटना घडली तर दुसरी घटना सोमवारी (दि.१०) सकाळी ८ च्या सुमारास स्टेशन रोडवरील मल्हार चौकात घडली.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, वर्षा प्रितम मुथा (वय ३६, रा. पुनम मोतीनगर, चैतन्य कॉलनी) या रबिवारी संकष्टी चतुर्थी असल्याने त्यांच्या जावेसह दुचाकीवरून माळीवाडा येथील विशाल गणपतीचे दर्शनासाठी गेल्या होत्या.

त्या दर्शन घेऊन घराकडे जात असताना रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या चोरट्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या राजश्री यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे गंठण ओरबाडले. त्यामुळे फिर्यादी व त्यांची जाव राजश्री या गाडीच्या खाली कोसळल्या.

दरम्यान त्यांनी चोरट्यांचा प्रतिकार करून अर्धा तोळ्याचा एक तुकडा वाचवला. मात्र दीड तोळ्याचे गंठण घेऊन चोरटे पसार झाले. दुसरी घटना स्टेशन रोडवरील मल्हार चौकात घडली.

याबाबत पुजा आशिष भळगट (वय ३२, रा.आनंदनगर, मल्हार चौक) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी भळगट या सोमवारी सकाळी मल्हार चौकातील दुकानात दुधाची पिशवी आणण्यासाठी गेल्या होत्या.

तेथून पुन्हा घराकडे परतत असताना मोटारसायकलवर भरधाव वेगात आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दीड तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारुन तोडून नेले. दरम्यान शहरात दिवसाढवळ्या अशा प्रकारे चैन स्नॅचिंगचे प्रकार वाढू लागल्याने नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरू लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button