अहमदनगर

विवाहिता बाथरूममध्ये अंघोळ करत असताना तरूणाने…

अहमदनगर- विवाहिता बाथरूममध्ये अंघोळ करत असताना तरूणाने बाथरूममध्ये घुसून तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. गैरवर्तन करणारा तरूण संतोष बोरूडे (रा. चौरे मळा, श्रीरामनगर) याच्याविरूध्द कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे.

 

संतोष बोरूडे याने सुमारे सहा महिन्यांपासून ते 23 नोव्हेंबरपर्यंत फिर्यादीच्या मोबाईलवर वेळोवेळी फोन करून शरीर सुखाची मागणी केली. एक दिवस फिर्यादी बाथरूममध्ये अंघोळ करत असताना त्यांच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

 

तसेच वेळोवेळी फोन करून शेजारी राहणार्‍या महिलेसोबत बोलणे करून देण्याचे सांगितले. फिर्यादी यांनी त्याला नकार दिल्यानंतर त्याने फिर्यादीसह त्यांच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button