अहमदनगर

महिला लहान मुलासह घरात असताना तिघे जण घरात घुसले अन्…

पती ड्रायव्हर असल्याने ते कामाला गेले होते. रात्रीच्या वेळी पत्नी मुलासह घरात होती. त्यावेळी तिघे जण त्यांच्या घरात घुसले आणि मारहाण केली. गैरवर्तन करत विनयभंग केला.

पती घरी आल्यानंतर घडलेला प्रकार पत्नीने त्यांना सांगितला असता त्या तिघांनी पतीलाही मारहाण केली असल्याची घटना उपनगरात घडली. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाऊसाहेब आहेर, तुकाराम गाडेकर व प्रसाद पवार अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. गुरूवारी रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली.

फिर्यादी यांचे पती कामाला गेले होते. गुरूवारी रात्री त्या व त्यांचा लहान मुलगा घरी होता. त्यावेळी भाऊसाहेब, तुकाराम आणि प्रसाद फिर्यादी यांच्या घरी आले व म्हणाले,‘पाण्याचा पाईप द्या, तो आपला सामाईक पाईप आहे’.

फिर्यादी यांनी पाईप देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. तिघांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केले. भांडणामध्ये फिर्यादी यांचे एक तोळ्याचे मिनी गंठण गहाळ झाले आहे.

फिर्यादी यांचे पती घरी आल्यानंतर त्यांना झालेला प्रकार सांगितला. ते आरोपींना जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button